” पत्त्याच्या क्लबमधून बोलतोय ”
……………………………………
सारासार प्रमाणे या अवतीभवतीच्या जगाचा विचार केला तर माणूस हा परिश्रम करणारा प्राणी आहे मग ते कष्ट शारीरिक असो किंवा बौद्धिक असो पण दमल्या भागल्या जीवाला विरंगुळा म्हणून काही छंदांची निर्मिती झाली नव्हे केली गेली आणि त्याचं बरोबर व्यसनांची पण केली असं काय कुठे लिहिलेलं नाही किंवा कोणी थोरा मोठ्यानी पण सांगून ठेवलेलं नाही की विरंगळा म्हणून याचं जतन केलं पाहिजे पण काही लोक पुढे खड्डा आहे ही माहीत असून पण मुद्दाम त्याच्यात जातात मग त्यांच्या आहारी जाऊन संसार प्रपंच आणि योगायोगाने जीवन बरबाद करतात पण आपण आज 52 पत्ते म्हणजे पत्त्याचा कॅट याच्या विषयी जरा विचार करू
अगदी खरोखर आणि बरोबर पण आहे की हा एक जुगार आहे या दुनियेमध्ये बहुतेक करून असा कोणी नाही एखादा अपवाद असेलही कोणी पण या जुगारीवर संसार प्रपंच चालवून दोन गुंठे जागा घेतली आणि ही शक्य नाही तर हे असणे पत्ते बरं पत्ता म्हणावा तर हा पुठ्ठ्यापासून किंवा प्लास्टिक पासून बनवण्यात येणारा एका हाताच्या पंजा एवढा पातळ आयताकृती कागद आहे अनेक या अशा पत्त्याच्या समूहाला कॅट म्हणतात परंतु एका कॅटमध्ये काही विशिष्टच पत्ते असावे लागतात
आणि हे पत्ते विविध बैठ्या खेळासाठी वापरण्यात येतात सर्व पत्त्यांची बाजू समान असते म्हणजे सगळ्यांचा आकार एक सारखा असतो त्याची एक बाजू पूर्णपणे कोरी असते मात्र प्रत्येक पत्त्याची दुसरी बाजू दुसऱ्या पत्त्यापासून वेगळी असते खेळण्या व्यतिरिक्त पत्त्यांचा वापर जादूमध्ये भविष्य कथन किंवा पत्त्यांचा बंगला बनवण्यामध्ये सुद्धा होतो विशेष करून जुगारांमध्ये याचा वापर जास्त प्रमाणात होतो
पत्त्यांचा खेळ हा जागा…वेळ… वय…व आर्थिक स्तर…असे कसलेही बंधन नसलेला विश्वव्यापी खेळ आहे
हा खेळ आजोबा नातू यांच्या निरागस भिकार सावकार खेळापासून थेट लाखो रुपयाची हारजीत करणाऱ्या जुगारापर्यंत फिरतो पत्त्याचा बंगला सतत कोसळत असून सुद्धा पुन्हा पुन्हा बांधण्याचा आपण अनेकांनी प्रयत्न केलेला आहे पत्त्याच्या खेळाने मराठी साहित्याला अनेक शब्द दिले जीवनात येणारी परिस्थिती आणि हातात येणारे पत्ते हे आपल्या इच्छेनुसार येत नसल्यामुळे पत्त्याची उपमा एका ठराविक पातळीवर पोहोचते.
अनेकांनी पत्त्याच्या आधाराने सांगितले जाणारे भविष्य पण जाणून घेतलेले आहे तर जरा खोलवर विचार केला असता पत्त्यांचा जुना उल्लेख चीनमधील नवव्या शतकात आढळतो हे पत्ते मोगल मंडळींनी 16 व्या शतकामध्ये भारतात आणले. भारतामध्ये गंजीफा या पत्त्यांनी गोलाकार धारण केला पत्त्याची संख्या हे विष्णूचे दहा अवतार… राशी.. नवग्रह…यांच्या आधारे 120 पर्यंत पोहोचली गंजिफा हे चौकोनी…आयताकृती… षटकोन… या आकाराचे सुद्धा होते ते हस्ती दंतापासून तयार केले जायचे
पण आपल्या महाराष्ट्रामध्ये सावंतवाडीच्या राजाने त्यांच्या कारागिरांची कला टिकविण्यासाठी त्यांना लाकडी खेळाबरोबर खास प्रकारच्या कागदाचे गंजीफा बनवण्याची उत्तेजना दिली तेथे राजवाड्यात खास प्रकारचे गंजीफा बनवून विकले जायचे तेथे प्रत्येक पत्ता हाताने रंगवला जायचा त्यातील बारकाव्याने रंगवलेली चित्रे विदेशात प्रसिद्ध व लोकप्रिय आहेत या संख्याचे खोके सुद्धा आकर्षक चित्रांनी व विविध रंगांनी रंगवलेले असायचे त्यांची चेहरेपट्टी आणि वस्त्रावरील चित्रे अस्सल मराठी धाटणीची असायची त्यातील राजा… राणी… आणि गुलाम हे सर्व मराठी वेशभूषेत असायचे.
राजाच्या कमरेला तलवार,हातात फुल, कपाळाला गंध… राणीसाहेबांच्या डोक्यावर, पदर नाकात नथ… तर हातामध्ये तलवार, घेऊन सज्ज असलेल्या गुलामाच्या पाठीवर ढाल आणि कपाळीगंध… त्या संचाचा लाकडी डबा रंगसंगतीने छान चित्राने रंगवलेला असायचा विष्णूंच्या दहा अवताराच्या 120 पत्त्यांच्या संचामध्ये अनेक अवताराचे चित्र असलेला एकेक पत्ता म्हणजे राजा दुसरा साधारण संबंधित चित्र असलेला एक एक पत्ता म्हणजे पीर / प्रधान म्हणजे वजीर असतो नंतर एक्का ते दश्शी असे दहा दहा पत्ते प्रत्येक अवताराचे 12 पत्ते आणि दहा अवताराचे 12 पत्ते म्हणजे इस्पिक… किलवर…बदाम…चौकट…दहा अवताराचे एकूण 120 पत्ते मच्छ…कच्छ…वराह… नरसिंह…आणि वामन…या पहिल्या पाच अवतारा मधील पत्त्यांची किंमत म्हणजे अवतार पत्ता सर्वश्रेष्ठ नंतर वजीर एक्का दुर्री असे करत करत दश्शी सर्वात कमी किमतीची असते.
अवताराचा पत्ता सर्वात श्रेष्ठ नंतर वजीर नंतर दश्शी…नश्शी असे करत करत सर्वात कमी किमतीचा तसेच प्रत्येकाचा एक एक पत्ता असे एकंदर 52 पत्ते आणि दोन जोकर असा तो संच असायचा
आतापर्यंत आपण प्राथमिक बाबींचा विचार केला पण एकदा का तो पत्त्याचा कॅट उघडला तर आत मध्ये 52 पत्ते व आपण मनोरंजनाच्या दृष्टीने जरी हा खेळ खेळत असलो तरी काही लोक तरी हे मानतात की हा खेळ काही अशा वैज्ञानिक विचारावर आधारलेला आहे आणि आपल्या आसपासचं नैसर्गिक वातावरणाचा पण यात समावेश आहे तर यामध्ये चार प्रकारचे म्हणजे इस्पीक…किलवर… चौकट… आणि बदाम असे चार प्रकार व प्रत्येकाची 13 पाने असे त्यांचे अस्तित्व असायचे तर त्या 13 जणांमध्ये एक ते 10 अंक राजा…राणी… आणि गुलाम असं वर्गीकरण केलेलं असायचं
तर त्याचं उदाहरण पाहू 52 पत्ते म्हणजे सर धोपट गणिताप्रमाणे 52 आठवडे दहा अंक व तीन चित्रे म्हणजे 13 चार प्रकारांमध्ये म्हणजे 52 त्यामध्ये एक विनोदाचा बादशाह जोकर किंवा दर तीन वर्षांनी येणारे लीप वर्ष म्हणजे दुसरा जोकर आता यातील किलवर व इस्पिक यांचा काळा रंग म्हणजे रात्र आणि बदाम व चौकट लाल रंग म्हणजे दिवस दर्शवतो आता आपण पाहू एक पासून दहा पर्यंत अंक त्याचा सर्वसाधारणपणे विचार केला तर एक म्हणजे माणसाचा विवेक अथवा नियत म्हणजे आचरण… दोन हे पृथ्वी व आकाश… तीन म्हणजे ब्रह्म विष्णू महेश…चार म्हणजे ऋग्वेद, सामवेद,अथर्ववेद, व यजुर्वेद हे चार वेद होय…पाच हा अंक पंचप्राण दर्शवतो… तसेच सहा म्हणजे माणसाच्या अंगी असलेले सहा षड रिपु म्हणजे काम, क्रोध,मोह,मद,लोभ, माया… त्याचप्रमाणे सात आकडा सात सागरांचे प्रतिक दर्शवतो… आठ म्हणजे आठ सिद्धी… नऊ ग्रहांचे प्रतीक… तर दहा म्हणजे मनुष्य प्राण्यांमध्ये असलेले दहा इंद्रिय… छातीच्या वरचे पाच,छातीच्या खालचे पाच…गुलाम म्हणजे मनात निर्माण झालेली वासना…राणी म्हणजे माया… राजा म्हणजे सर्वांचा शासक… अर्थात परमेश्वर…
पण जर आपण मानल्यास सिद्ध होतो
आता थोडं अजून पुढच्या टप्प्यावर जाऊन जरा डोकावून पाहिलं तर याला सखोल बुद्धिमत्ता किंवा योगायोग यांचा मेळ लवकर लागत नाही… आता यातील रंगसंगती व दर्शकताच्या दृष्टीने विचार केला तर इस्पिक हे चिन्ह नांगरणी अथवा कर्तव्य दर्शवते… तसेच बदाम हे पेरणी किंवा प्रेम हे व्यक्त करते…
किलवरला आपण भरभराटीचे प्रतीक समजतो…आणि चौकट म्हणजे पिकांची काढणी म्हणजे सुगी किंवा स्थावर संपत्ती दाखवते… तर पत्ते हा खेळ नसून त्यामागे एक सखोल विचार व ज्ञान आहे आणि हा पत्त्याचा डाव खेळताना आयुष्याचा अर्थ समजून घेतला तर सुखी जीवन जगणं नक्कीच सोपं होऊन जातं आणि वास्तवतेचा म्हणजे सत्य परिस्थितीचा जर विचार केला तर या 52 पत्त्यामध्ये 100% चार एक्के असणार हे तर
आम्हाला सर्वांना माहितीच आहे पण वेळ आहे किंवा आवश्यकता आहे त्याला शोधण्याची या 52 लोकांची यादी जर केली तर त्यात आपले नातेवाईक… इष्टमित्र… आपण काम करतो त्या कार्यक्षेत्रातील सवंगड्यांचा पण समावेश करायचा व 52 लोकांची भली मोठी यादी तयार करायची एखादी योजना आखायची आणि त्यांच्यापुढे मांडायची खरं सांगतो ती लिस्ट वाचताना 52 नंबर येईपर्यंत ते चार लोक आपल्याला बळं होऊन येऊन भेटतात आणि जेणे करून आपलं काम किंवा उद्दिष्ट ध्येयापर्यंत पोहोचून ते सार्थ केलेलं असेल असं म्हणावं लागेल याला बव्हंशी आपली समाज व्यवस्था असं म्हटलं तरी चालेल आपण पाहतो प्रत्येक पशु…पक्षी…आणि वन्य प्राणी हे कळपाने राहणे पसंत करतात
मग यामध्ये माणूस मागे कसा राहील कारण ज्यावेळी नैसर्गिक परिस्थिती ही प्रतिकूल रूपाने समोर उभा राहते त्यावेळी त्याला प्रखरपणे तोंड देण्यासाठी मग तो आपल्या जाती-धर्माचा नसला तरीही एकी निर्माण होते आणि या संकल्पनेतूनच वसाहत किंवा गावांची निर्मिती झाली हे तर आपल्याला केव्हा पण मान्य करावेचं लागेल….
…………………………………………………….
किरण बेंद्रे
पुणे
7218439002
Comment here