आम्ही साहित्यिकपुणे

………. प्राण्यांचं नेटवर्क …………

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

………. प्राण्यांचं नेटवर्क …………


हे बघा आपण आज जाणार आहोत प्राण्यांच्या विश्वात आपण रोजच वेगळे वेगळे प्राणी पाहतो त्यांच्या सहवासात राहतो त्यांचा रोजचा जीवनक्रम पण जाणून घेतो पण त्यांना जर काही सांगावसं वाटलं किंवा व्यक्त व्हावं असं वाटलं तर अशा वेळी एकतर ते बोलू शकत नाहीत कारण बोलणे एक संदेश देणे अथवा घेणे याचं एक प्रभावी साधन आहे एक तर त्यांची जी ओरडण्याची म्हणजे चिवचिवाट…हंबरणे… भुंकणे… किंवा गुरगुरने या क्रिया किंवा त्यांच्यातील काही शारीरिक बदल अथवा विशिष्ट हालचाली एक वेगळा संकेत देतात.


आणि इथून सुरुवात होते ती प्राण्यांच्या नेटवर्कची म्हणजे कम्युनिकेशनची संदेश वहनाची आता हे सगळं इथपर्यंत ठीक आहे पण त्यांनी दिलेला संकेत किंवा हावभाव याचा उलगडा जर माणसाला झाला तर खरं आज आपण अशाच एका दुर्मिळ विषयावर स्वार होणार आहोत व जमेल तेवढी भटकंती करणार आहोत आता एकदम साधं आणि सोपं उदाहरण घेऊ आता बघा शेतकऱ्याने शेती कामाचा थोडासा भार हलका करून बैलाला झाडाला बांधून आपण पण त्या गाठोड्यातील कोर दीड कोर भाकर खाऊन तिथेच ढेकळात पडलाय घनघोर झोप पण लागलीयं पण बैल थोड्या अंतरावर दुसऱ्या लिंबाला बांधलेला होता पण भर झोपेत त्या बैलाचं ते हंबरणं पडल्या पडल्या ओळखलं की बैलाला पाणी पाहिजे का वैरण पाहिजे तसंच आपण आता कोंबडीचं उदाहरण घेऊ समजा आपल्याकडे 5-25 कोंबड्या आहेत समोरच्या उकिरड्यावर काहीतरी

 

 फिसकटून खायचा कार्यक्रम चालू आहे तुम्ही पाहुणे म्हणून गेलात हातात मूठभर जवारी घेऊन अंगणात आला ऑ sss ऑ sss करून कोंबड्यांना बोलवायचा प्रयत्न केला तरी एक पण कोंबडी वंजळभर जवारी बघून पण ढुंकून पण बघत नाही किंवा येत नाही थोडक्यात म्हणजे दुर्लक्ष करतीयं पण त्याच घरातील त्या माऊलीने नुसतं ऑ sss ऑ sss केलं तरी मॅरेथॉन मध्ये पळाल्यावानी शर्यत केल्यासारखी सगळ्या कोंबड्या धावत अंगणात हजर तर हे आहे एक प्रकारचं मुक कम्युनिकेशन
आता आपण इतर बाबीचा पण विचार करू म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर प्राणी शरीरातील ठराविक पेशी प्राणी आपल्या विशिष्ट हालचालीने दुसऱ्या पेशीचं किंवा प्राण्याचे वर्तन बदलू शकतात किंवा आपल्या मनातील हेतू व उद्देश याचं ज्ञान त्यांना करून देतात अशा हालचालींना किंवा वर्तनाला संदेशवहन अशी संज्ञा आहे तर अशा संदेशांला दुसऱ्या पेशी कडून अगर प्राण्यांकडून प्रतिसाद दिला जातो अनेक प्राणी तोंडाने अगर अवयवाच्या साह्याने निरनिराळ्या प्रकारचे आवाज काढून संदेश वहन करतात तसेच प्राणी हे अंगावरील खवले… पिसे… व केस ताठ उभा करून शेपटी वर खाली जोराने आपटून…कठोर मुद्रेने बघून…अगर डोक्याची विशिष्टरित्या वर खाली स्वरूपात हालचाल करून…संदेश वहन करतात
मात्र कीटक… मासे यासारखे प्राणी आपल्या शरीराच्या हालचालीने संदेश वहन करतात मानव मात्र संदेशवहनासाठी शारीरिक हालचालीपेक्षा तोंडाने शब्दोचार करतो शब्द ठराविक पद्धतीने नियोजन व त्याचा विशिष्ट अर्थ असणारी वाक्ये तयार करून संदेशवहन करतो या शब्दाचा उपयोग करण्याच्या पद्धतीला भाषा असे म्हणतात निरनिराळ्या मानव जातीच्या निरनिराळ्या भाषा आहेत संदेश वहनाचे सर्वसाधारणपणे पाहण्यात येणारे ढोबळपणे दोन प्रकार आहेत पहिल्या प्रकारात नाकतोड्या सारखे कीटक आपले पाय व पंख यांचे परस्परावर घर्षण करून विशिष्ट प्रकारचा आवाज काढून स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात तर याच कारणासाठी काजवा आपल्या शरीरातून प्रकाश बाहेर फेकतो फुलपाखरं…मुंग्यासारखे कीटक स्वतःच्या शरीरातून वास येणारी द्रव्य बाहेर टाकून आपल्या जातीतील कीटकांना स्वतःच्या अस्तित्वाची ओळख सांगतात
आणि मधमाशासारखे कीटक आपल्या मोहोळावर विशिष्ट पद्धतीने चालून त्यांना हवे असणारे अन्न म्हणजे मध आणि परागकण कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहेत याची माहिती मोहोळातील मधमाशांना देतात आणि दुसऱ्या प्रकारात प्राणी आपल्या शरीराच्या विशिष्ट हालचालींच्या संकेताने संदेश वहन करतात उदाहरणार्थ माकडं…कुत्री इत्यादी प्राणी आपल्या मालकाकडे प्रेमळ मुद्रेने बघतात…आपले डोके वर खाली वाकवून… कान मुडपून घेतात…जराशी वेगात पळाल्यासारखं करून स्वतःभोवती गिरकी घेतात…तोंडाने लाडिक आवाज काढून मालकावरील प्रेम व्यक्त करतात… परंतु हेच प्राणी अनोळखी माणूस समोर येताचं आक्रमक होतात शरीरावरील केस ताठ उभे करतात दात विचकून गुरगुरत त्याच्या अंगावर चावा घेण्यासाठी धावून जातात आणि आपला तिरस्कार व्यक्त करतात
अशा तऱ्हेने आपल्या शरीराच्या हालचालीबरोबरच इतर अवयवांचा उपयोग करून हे प्राणी संदेशवहन करतात कित्येक किटकं आपली घर बांधताना विशिष्ट पद्धतीने बांधून संदेशवहन करतात काही गांधील माशा झाडाचं खोड पोखरून आपलं घर तयार करतात ही पोकळी अरुंद असते मादी या पोकळीमध्ये अंडी घालतात ते अशा पद्धतीने अंडी घालतात की अंड्यामधून बाहेर पडणाऱ्या अळीचं तोंड खोडाच्या पृष्ठभागाकडे राहावे जेणे करून ती आळी खाली किंवा बाहेर पडणार नाही त्या अरुंद पोकळीमध्ये आळीला अजिबात वळता येत नाही अळीचा काही दिवसांनी कोश तयार बनतो नंतर कोशातून प्रौढ किटक बाहेर पडतो या प्रौढ किटकाचे तोंड खोडाच्या पृष्ठभागाकडे असल्यामुळे तो या पोकळीतून वर सरकतो त्यावेळी तो आपोआप खोडाच्या बाहेर पडतो
शास्त्रज्ञांच्या मते त्या आळीने त्या पोकळीत कसं राहावं याचं संदेशवहन गांधील माशी अंडी घालताना करते अंडी विशिष्ट पद्धतीने पोकळीत घालते हाच एक प्रकारचा संकेत आहे त्याप्रमाणे पक्षांचा जर विचार केला तर निरनिराळ्या प्रसंगी वेगवेगळी हालचाल करून संदेशवहन करतात आक्रमणाच्या वेळी हे पक्षी आपले डोके शरीराच्या पुढेमागे ताणून घेतो तर शरणागतीच्या वेळी डोकं मागं नेऊन 90° मध्ये वळवलं जातं अनेक पक्षी आपल्या वावरण्याच्या टापूत इतर पक्षांनी प्रवेश करू नये म्हणून विशिष्ट प्रकारचे आवाज काढून त्यांना इशारा देतात प्रजोत्पादन काळात नर पक्षी आपल्या शरीरातील रंगीबेरंगी पिसे उभारून पंख फुगवून आणि गोड गाणी गाऊन मादी पक्षांना विशिष्ट संकेतांद्वारे त्यांचे लक्ष आपणाकडे वेधून घेतात काही पक्षी या काळात आपल्या रंगीत पायांचे प्रदर्शन करून मादी पक्षांना आकर्षित करतात
त्याचप्रमाणे सस्तन प्राण्यांमध्ये सुद्धा अनेक उच्च वर्गीय पशु म्हणजे वाघ… सिंह…चित्ता… शत्रू समोर दिसल्यावर आपले तोंड उघडून तोंडातील तीक्ष्ण दाताचे प्रदर्शन करतात व शत्रूला भीती दाखवून हल्ला करण्यापासून परावृत्त करतात हरीण आपल्या प्रतिस्पर्ध्याबरोबर लढत असताना एकदम तोंड फिरवून वेगाने दूर पळते या आपल्या वर्तनाने ते प्रतिस्पर्ध्याला आपण शरणागती पत्करलेले संदेशवहन करते तर हिंस्त्र पशु शत्रूसमोर दिसल्याबरोबर आपल्या अंगावरील केस ताट करतात शेपटी वळवळू लागतात व जबडा उघडून दाताचे प्रदर्शन करतात व गुरगुरू लागतात आता आपण पाहू एक मेंढपाळ दोन-चारशे मेंढ्या घेऊन रस्त्याने जात असतो किंवा राना मधून जात असतो त्याला ठराविक ठिकाणी विशिष्ट रस्त्यावर मेंढ्या वळवायाच्या असल्यावर तो कोणताही इशारा न करता ठराविक आवाज काढल्याबरोबर दोन रस्ते फुटत असताना कोणत्या रस्त्याने जायचे हे मेंढ्यांना ताबडतोब या संदेश वहनाने कळते तसेच ढाबळी मधून सोडलेले शंभर दीडशे कबूतरं दिवसभर फिरून मालकांनी टेरेसवर जाऊन विशिष्ट प्रकारची शिट्टी मारली की असेल तिथून दोन पाच मिनिटांमध्ये हजर होतात अशी आपल्या भोवती व समाजामध्ये कित्येक तरी मूक संदेशवहन आहेत फक्त आपण अनुभवायला हवं एवढाच फरक आता बघा साधं गाईची धार काढायची झाली तर ठराविक माणसनचं बादली घेऊन खाली बसाव लागतयं हे त्या गाईला मुक स्पर्शाने कळतं एवढं करून पण ज्या वेळेला तो धार काढतानी राम कृष्ण हरी म्हणतो तवा जराच कमी अर्धा पाऊण बादली दूध गाय देते पण त्या ठिकाणी जर दुसरा कोणी गेला आणि धार काढायला सुरुवात केली थोडं फार दूध बादलीत जमा झाल्यावर गाय बादलीत पाय घालून दूध सांडती ह्याला उठायचं जमत न्हाय तवा मात्र दूध काढणाराची फजिती होते तवा ह्याचं राम कृष्ण हरी सुरु व्हतंय म्हणजेच त्या गाईच्या आसपास असणारा ठराविकच माणसाचा वावर ही पण एक संदेश वहनाचीच बाब आहे
…………………..😂…………………………..
# किरण बेंद्रे
पुणे
7218439002

litsbros

Comment here