आम्ही साहित्यिक

*** काय त्या दगडाचं कवतिक ***

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

*** काय त्या दगडाचं कवतिक ***


आज माझा जो विषय आहे त्याचा थेट संबंध येतो देव देवतांच्या मंदिराच्या गाभार्‍याशी आणि मूर्तीशी आहे कारण गाभाऱ्यात अवतीभवती हिरवळ नसती… घरदारं नसतात… झाडं झुडपं पण नसतात… असतो तो फक्त काळा पाषाण आणि समोर त्या जगजेठी ची मूर्ती…
अन खरं बघायला गेलं तर या अशा वातावरणामुळेच मला लेखनाची प्रेरणा मिळाली आणि माझ्या लेखाचा उगम इथं झाला आपण सर्वांनी आतापर्यंत इतिहासात कितीतरी युगांची नावं ऐकली असतील इतिहासाचे आणि आपले प्रेमाचे जरी संबंध असले तरी त्याची छेडछाड करण्याची आपली वैचारिक पातळी नाही आणि एक तर इतिहासातलं आपल्याला काय कळत पण नाही इतिहास म्हणजे आपला भूतकाळ आणि त्याचा तो अमूल्य खजिना असूनही आपण काही काही बाबींची शहनिशा करायसाठी इतिहासाचं बोट पकडून चार पावलं त्याच्या बरोबर चालतो आता बघा

 वरीलपैकी आपण अश्मयुग ओझरतं का होईना ऐकलं असेल कारण त्याकाळी मानव जमात सुद्धा प्रगत नव्हती आदिमानवांचा बहुतेक वावर होता आता अवजड वस्तू किंवा आहे त्या भौतिक अवस्थेमध्ये एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जर स्थलांतरित करायची झाली तर पहिली काय आता सारख्या ट्रान्सपोर्टच्या व्यवस्था नव्हत्या दोन दगडांच्या चाकांना थोडासा गोलाकार द्यायचा त्या दोन चाकांना आरी पण दगडाचीच त्यावर आडवा तोडीसारखा दगड लावून गाडी करायची व त्यावर सामान लादून ते आदिमानव ओढायचे तर सांगायचा मूळ उद्देश म्हणजे

 आपल्याला दगडाचा अभ्यास करायचा आहे आपण दगड म्हटलं कि काही वेळा दुर्लक्षित समजतो पण त्याच दगडापुढे राजा काय आणि रंक काय सगळेचं जणं नतमस्तक होतात
आता बघा मंदिरात गेल्यावर तिथे दगड आपण पाहतो त्याला धार्मिक भाषेत दगड न म्हणता पाषाण असा उल्लेख करतात कारण या दगडाचं एक वैशिष्ट्य आहे त्या दगडाच्या आकारावरून नाही तर त्याच्या वास्तव्यावरून त्याचं मोल कळतं तो दगड पायरी झाला तर दमल्या भागल्या जीवांची क्षणभर विश्रांती ठरते…तोच दगड गाभाऱ्यात जाऊन एखाद्या आदिमायेचा…जगजेठीचा…किंवा भगवान शिवांचा अवतार होऊन स्थापित झाला असेल तर त्याच्यापुढे सारेचं जण नतमस्तक होतात आपला माथा आपोआप तिथे टेकला जातो आता आपण त्या इतिहासाच्या थोडं वास्तवाचा विचार करू आणि या पाषाणाच्या मूर्तीमध्ये आपली भक्ती पुन्हा एकदा जागृत करायची ताकद असते म्हणजे बघा आपली भक्ती आढळ आहे हे एक शाश्वत आहे आता ती जी भक्ती आहे ती एक श्रद्धा आहे आणि त्याचे पण वेगवेगळे मार्ग आहेत आता खरं बघायला गेलं तर दगडाचा प्रत्येकाच्या आयुष्याशी कोणत्यातरी मार्गाने संबंध हा आलेला असतो आणि विचार केला तर जीवनाचा तो एक अविभाज्य घटक म्हणावा लागेल आणि ज्यावेळी दगडाचा थोडासा जरी अंश अप्रत्यक्षरीत्या आपल्या शरीरात गेल्यावर शरीर तंदुरुस्त राहण्यात फार मोठी मदत होते पण ते आपल्या दृष्टीक्षेपात येत नाही आणि बहुतेक जण काय कितीतरी जणं त्याला मानायला तयार नाहीत म्हणजे बघा त्याचं काय झालं अलीकडच्या काळात मिक्सर आणि फूड प्रोसेसर नी जोर धरलेला आहे त्यामुळे अंग मेहनत थोडीशी कमी झालीय

आता पहिलं काय घरामधी प्रत्येक घरात दळणासाठी दगडी जातं… कोपऱ्यात उखळ…अंगणात रांजण… तुळशीवृंदावन…ही आपली संस्कृतीची आणि गरजेची सामग्री होती पहिलं घरात जातं कुठेतरी कोपऱ्यात बसवलेलं असायचं आणि त्यातून जन्माला येणाऱ्या आपल्या जात्यावरच्या ओव्या या ओव्यांमध्ये भावाचा… बहिणीचा…आई बापाचा… आणि भगवंताचा… उल्लेख कौतुकास्पद असायचा त्या शब्दांची विणकाम बेहतरीन केलेली असायची आजही 100 वर्षांपूर्वी गायलेल्या ओव्या सर्वांनी ऐकलेल्या आहेत अहो सिनेमाची आणि डी जे ची गाणी काय येतात आणि जातात त्यांची पण थोडीशी हवा होते नंतर लोकं विसरून जातात पण या ओव्या अजून ताज्या तवान्या वाटतात ज्यावेळी दोन माऊल्या ते दळण दळण्यासाठी जात्यावर बसतात आणि सुरात सूर मिसळून गायला लागतात तवा मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटतंय
आणि ही जातं बहुतेक दगडाचं असतयं पण इथं विशेष गौरव करावा लागेल तो माझ्या पांथरवट बांधवांचा कारण त्यांचा छन्नी हातोडा जसा जसा चालेल तसं तसं त्या पाषाणाला देवत्व प्राप्त होत असतं सलाम अशा किमयागाराला… पिठाच्या गिरणी मधील जातं हे कुरुंदाच्या दगडाचं असतं साधारण दोन हजार वर्षापासून जातं प्रचलित आहे सिंधू संस्कृतीची समकालीन आणि समान असलेल्या लोथल मधील उत्खननामध्ये फक्त दोन तळ्यापैकी वरची तळी सापडली तसेच वरची तळी असलेली जाती नेवासे…तडकोड…वडगाव… व शिरपूर… येथील उत्खननामध्येही मिळाली आहेत नागार्जुन आणि तक्षशिला येथील उत्खननामध्येही सापडली आहेत नेवासे मधील उत्खननांमध्ये तर अनेक जाती सापडल्या पिठाच्या गिरण्या सुरू होण्यापूर्वी आपल्या कुटुंब जीवनात जात्याला फार महत्त्वाचं स्थान होतं आज ही खेड्यात राम प्रहरी जात्यावरची घरघर आवाज येतो घरघरी बरोबरच दळणाऱ्या स्त्रियांच्या मुखातून निघणाऱ्या अमृतमधुर ओव्याही ऐकायला मिळतात गाण्याने श्रम हलके होतात म्हणून जात्यावर दळण दळताना स्त्रिया ओव्या म्हणायच्या या ओव्या अनेक स्त्रियांनी सहजपणे रचलेल्या असतात त्यामध्ये स्त्री हृदयातील अनेक भावभावनांचे कल्लोळ व्यक्त केलेले दिसतात एखादी जबाबदारी स्वीकारली की ती पार पाडण्यासाठी क्षमता आपोआप येते हा भाव व्यक्त करण्यासाठी जात्यावर बसल्यावर ओवी सुचते अशी म्हण मराठीत प्रचलित आहे जात्यावरच्या ओव्यातून जात्याविषयीची कृतज्ञता अनेक प्रकारे व्यक्त झालेली आहे जात्याला ईश्वर मानून या ओव्या गायल्या जातात आता बघा जात्यातून… ईश्वरा तुझं जेवण मला ठाव l घास घालते मनोभाव ll थोरलं माझं जातं l खुंटा त्याचा चकमकी l आम्ही दळू या मायलेकी ll थोरलं माझं जातं चवघी बायकांचं l घर वडील नायकांचं ll गीताच्या छंदात दळण सरत आल्यावर मराठी स्त्री आपल्या भक्ती संपन्न भावनेच्या स्पर्शाने ओलावलेली एखादी ओवी म्हणून असा उल्लेख करते
पूर्वी बघा ग्रामीण भागात वीज पोहोचलेली नव्हती त्यावेळी ग्रामीण भागातील स्त्रिया भल्या पहाटं जात्यावर दळण दळत असायच्या आधुनिक काळात जात्याची जागा विजेवर चालणाऱ्या गिरणी म्हणजे चक्कीने घेतली आहे तरी आजही ग्रामीण भागामध्ये जातं हे वापरलं जातं व लोकप्रिय सुद्धा आहे जात्यावर कडधान्यही भरडली जायची धान्य जात्यात दळून त्याचं बारीक पीठ करतात जातं ही आकाराने वर्तुळाकार गोल असतं जातं दगडाचं असून त्याच्या दोन तळ्या असतात खालची तळी ही स्थिर असते वरच्या तळीला कडेला एक लाकडी खुंटा असतो हा खुंटा हाती धरून वरची तळी फिरवता येते या तळ्याच्या मध्यभागी असलेल्या छिद्रातून थोडे थोडे धान्य टाकतात आणि दोन्ही तळ्याच्या घर्षनामुळे त्या धान्याचे पीठ होऊन तळ्याच्या कडेच्या फटीतून बाहेर येते घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवले जाते पूर्वीच्या स्त्रिया ज्या जात्यावर दळण दळायच्या गाणी म्हणायच्या त्याला जात्यावरची ओवी म्हणतात त्यातला दुसरा प्रकार उकळी जातं हे म्हणजे गोल आकाराचं असून खाली निमुळतं असतं तळीच्या वरची बाजू किंचित अर्धगोल असून तिचा खालचा भाग खोलगट काही वरच्या बाजूला खुंटा बसवण्यासाठी भोक पाडलेले असते धान्य घालण्यासाठी वरच्या तळीला तोंड असते नेवासे येथील उत्खननामध्ये या प्रकारची अनेक जाती सापडली आहेत त्यानंतर गोंडाचे मातीचे जाते वरची तळी बरीच उंच असते खालच्या तळीचा पृष्ठभाग तो चांगला बसतो मराठी प्राचीन वाङ्मयात संतांनी जात्यावर व दळणाच्या क्रियेवर रचलेली अनेक परमार्थिक रूपे आढळतात सतराव्या शतकातील प्रसिद्ध संत केशव स्वामी यांचे हे परमार्थिक दळण पाहण्याजोगे आहे तसं बघायला गेलं तर जातं म्हणजे घराची शोभा पावित्र्य त्याला जर चुकून पाय लागला तर नमस्कार करावा लागतो
साधारण दोन तळ्यांची युती म्हणावी लागेल मी तुझ्यासाठी कोकणातून खास जात्यावर दळलेलं आंबोळी पीठ आणलय गं… बघ कसं किंचीत जाडसर आहे एक तासभर दही किंवा ताकामध्ये भिजून ठेव आणि आंबोळ्या घाल बघ कशा जाळीदार फक्कड होतात त्या मैत्रिणींनं आणलेलं हे अप्रूप पीठ त्या जात्यावरच्या पिठाचं किती कौतुक करू आणि किती नको असं झालं होतं पीठ राहिलं बाजूला पण त्या दोघी मैत्रिणी मात्र जात्याबरोबर गरगर फिरत भूतकाळात पोहोचल्या असा या जात्याचा किस्सा माझ्या डोळ्यासमोर तो फ्लॅशबॅक दिसू लागला आहे घरातली सगळी माणसं आपल्या उद्योगधंद्याला जाईपर्यंत सूर्यदेव अगदी डोळ्यासमोर यायचा ओट्यावर ऊन आलं की दहा वाजले म्हणायचे आई दळणाच्या तयारीला लागायची काचेच्या बरण्यातील मेतकूट आणि त्याच्या उंचीने तळ गाठण्याची चिन्ह दिसली की तवा मेतकूट करायचं आईला वेध लागायचं
कारण घरामध्ये काही किंवा एखादी गोष्ट नाही असा शब्द नसण्यात गृहिणींची श्रीमंती मानली जाते मेतकूट भाजून झाल्यावर तिचा मोर्चा जात्याकडे वळायचा खाली जाड पोतं त्याच्यावर चौघडी घालून एक स्वच्छ फडकं घातल्यावर जात्याची बैठक सजायची लहान मुलं सायकलचा टायर कसा गोल फिरवत आणतात तसे हे जातं गाडी गाडी करीत आणून तयार केलेल्या आसनावर मधोमध त्याची प्रतिष्ठापना व्हायची तास दीड तास मेतकूट दळण्याचा कार्यक्रम चालायचा गोळ्याच्या सांबारांचा भरडा…थालपीठाचीभाजणी…साबुदाणा… खांतोळी… करण्यासाठी तांदुळाचा रवा… मोदकाची पिठी..खडेमीठ… पिठीसाखर…असं प्रासंगिक पण नैसर्गिक दळण हे चालूच असायचं जरा हात लाव गं असं म्हणून तिने बोलावलं की आस्मादिकांची स्वारी हलायची दळता दळता आईने सांगितलेल्या भूतकाळातील आठवणी गुणवत्ता यावर अवलंबून असते
खुंट्याला उजव्या हातात घेऊन जात फिरवायचं सुरुवात करायची सुरुवातीला हळूहळू फिरवत मग वेग वाढवायचा रवाळ दळण हवं असेल तर वेग कमी पण पुरतो पण बारीक गंधासारखा दळायला दळणाचा शेवट करताना जातं जोरात फिरवतात उजवा हात दमला की डावा हात पुढे येतो मांडी पण अधून मधून बदलली जाते रिकामा हात कधी कधी जवळच्या पायावर विसावतो मान मात्र त्याच्या बाजूलाच कललेली असते. संपूर्ण शरीर जात्याच्या गतीवर एका लयीमध्ये हलत असतं कधी एकटीनं दळण्यापेक्षा दुसरीचा हातभार घेतला जातो भुरू भुरू पीठ पडत राहतं जात्याच्या खालच्या तळीला टेकून पिठाच्या छोट्या छोट्या टेकड्या घेराव घालत असतात दोघीही रंगात आल्या की जातं वेगाने गरगरत राहतं ” गप्पा मुळे वाटतात श्रम हलके “अशी किमया घडते अनुभवी नजरेने आणि स्पर्शाने मधूनच पीठ चिमटीत घेऊन त्याची जात तपासली जाते
बघा शुद्ध भेसळ रहित पीठ स्वतःच्या श्रमदानानं आणि आपलेपणाने तयार करत मागच्या पिढीतल्या स्त्रीने स्वतःबरोबर घराचं आरोग्य खातं पण उत्तम सांभाळलं होतं जात्यामधून मुंजुळ ओवी घराघरातून ऐकू येते असं खेडे पाड्यातील पहाटेचे चित्र सुरेल केलं की ते जात्यानच जात्यावर बसलं की ओवी सुचते ही म्हणूनच ओवी आहे…अरे घरोटा घरोटा l तुझ्यातून येते पिठी l तसं तसं माझं गाणं येत पोटातून व्होटी ll असं मंजुळ स्वर आता ऐकू येत नाहीत…जात्या मधले दाणे रडती l सुपातले मग ते हसती ll कळेना त्याला मरण उद्याचं l अंतिया जगती ll असं सांस्कृतिक संचित असलेल्या जात्याला व जवळच्या खुंट्याला हळकुंड… सुपारी… बांधून त्याच्यामध्ये उडीद भरडले जातात आणि लग्नाच्या कामाचा शुभारंभ केला जातो लग्न समारंभा पूर्वी इष्ट देवकांची पूजा करताना पाच सवासनींना त्या जात्याच्या व पारंपारिक पूजेच्या साक्षीनं यथा सांग मान दिला जातो पूजन केलं जातं बांगड्या भरल्या जातात साडी चोळीचा आहेरही दिला जातो आणि लग्नाच्या शुभ कार्याचा शुभारंभ केला जातो
*****************************************
किरण बेंद्रे
पुणे
7218439002

litsbros

Comment here