आम्ही साहित्यिकपुणे

***** आदी मायेचा जागर ***** आजची स्त्री म्हणजे साक्षात आदीमायेचं रूप  आणि त्या स्त्री वर्गाला आदरपूर्वक सादर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

***** आदी मायेचा जागर *****
आजची स्त्री म्हणजे साक्षात आदीमायेचं रूप 
🙏 आणि त्या स्त्री वर्गाला आदरपूर्वक सादर 🙏
🌹🌹🌹🙏🌹🌹🌹

तसं बघायला गेलं तर सध्याचा काळ नवरात्रीचे पर्व आपला पवित्र आणि भक्तिमार्गाचा अवलंब करणारं एक अधिष्ठान आपण पाहिलेलं आहे प्रत्येकाची भक्ती वेगवेगळ्या स्वरूपाची… श्रद्धा वेगवेगळ्या स्वरूपाची…त्यामध्ये खरंच विचार करण्यासारखं म्हणजे तुळजापुराहून ज्योत आणून घटस्थापना करायची बरं ज्योत आणायची म्हणजे रस्त्याने धावत यायचं काय ती श्रद्धा म्हणायची

आता काहीजण पोटावर आपला नऊ दिवसाचा घट बसवतात आपली सेवा आदीमायेच्या चरणी रुजू करतात तसं बघाय गेलं तर भारतीय तत्त्वज्ञानानुसार अस्तित्वाच्या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला पायाभूत सुविधा आणि समृद्धी देणारी लक्ष्मी दुसऱ्या टोकाला शक्ती आणि संरक्षण देणारी महाकाली दुर्गा आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदू मध्ये ज्ञान कल्पना देणारी महा सरस्वती असते अशा प्रकारे या तीन शक्तीला महाकाली…महालक्ष्मी… आणि महासरस्वती असे स्थान दिलेले आहे.

पूजा तशी पुरुष दैवतांची केली जात असली तरी चर्चा होते ती त्याच्या शक्तीची त्यांच्या असलेल्या स्त्री शक्तीची म्हणून प्रथम आपण पाहू स्त्री ही एक देवता आहे ती आदिशक्तीचे रूप आहे आणि आपण सर्वांनी योगायोगाने समाजाने पण व एका व्यवस्थेने स्त्रीचा कायम आदर केला आहे पण मला एक समजतं आपण प्रत्येक वेळी नुसता हट्ट करतो की लेडीज फर्स्ट लेडीज फर्स्ट हे नुसतं दिखाऊपणा वाटतो

 पण घरामध्ये स्वयंपाक करून शेवटचा माणूस जेवल्याशिवाय अन्नाचा कण न घेणारी आपल्या घरातील आई…बहीण… पत्नी… किंवा मुलगी या सर्वात शेवटी जेवतात मग

 

 त्यावेळेस किंवा अशा काही ठराविक वाळणावर लेडीज फर्स्ट आपण विसरतो असो कारण शेवटचा माणूस जेवल्यावर त्यांनी धुतलेला हात आणि आलेला ढेकर पाहूनचं या माऊलींचं पोट भरतयं एवढेच काय माणूस विविध कार्यक्षेत्रात चमकतो समजा तो इंजिनियर आहे मोठा प्रोफेसर आहे मोठमोठ्या बिल्डिंग बनवतो शाळा कॉलेजात कितीतरी मुलांना शिक्षण देऊन सुसंस्कृत बनवतो पण हिला वरच्या पैकी काहीही येत नसलं तरी त्याच्या यशाच्या वाट्यात 50% वाटा हिचा असतो यालाच म्हणायचं स्त्री शक्तीचा जागर… स्त्री शक्तीला सलाम… 🙏

श्री आणि पुरुष यांच्यात केवळ शारीरिक भेद नाही तर स्त्री अधिक संवेदनशील श्रद्धावंत आहे तिला देवत्वाचं अस्तित्व अधिक जाणवतं एवढेच काय काही पण मनात शंका आली किंवा आपल्याकडून काहीतरी चुकीचं असं घडलंय अशी वेडी कल्पना जरी मनाला पुसटशी चाटून गेली

म्हणजे चालू गाडीत एखादं कोणतं तरी मंदिर पास झालं आणि काही क्षणा नंतर तिच्या लक्षात आल्यावर ती मागं मान वळवून पाया पडते आणि आपल्या उजव्या हाताचा पंजा आपल्या दोन्ही गाला लावायचं विसरत नाही देऊळ नक्की कोणाचं आहे हे सुद्धा माहित नसतं फक्त भगवी पताका पाहिलेली असते एवढी श्रद्धा या बाबतीत स्त्री संवेदनशील असते पुरुषांचे लक्ष मात्र भौतिकतेकडे व जडत्वावर अधिकार गाजवण्याकडे जास्त असते


स्त्री ही त्याग…नम्रता… आणि श्रद्धा तसेच सुजाणपणाची मूर्ती आहे ती कोणत्याच बाबतीत कमी नाही पारंपारिक रित्या पुरुषाची समजली जाणारी क्षेत्रे महिलांनी काबीज केलेली आहे झाशीची राणी…ताराबाई शिंदे… सावित्रीबाई फुले… यांच्या पावलावर पाऊल ठेवून कित्येक मान्यवर स्त्रियांनी आपापल्या क्षेत्रात कर्तव्य गाजवले तसेच पोलीस… लष्करी दल… त्याबरोबर रिक्षा… ट्रक चालवणे…रेल्वे ड्रायव्हिंग… पायलट…

पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचं काम करणारी… बसची कंडक्टर… पत्रकारिता… फायर ब्रिगेड ही क्षेत्र सुद्धा या आदीमायेने काबीज केलेली आहेत भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आणि मोठ्या पदावर कार्यरत असणाऱ्या महिलाच आहेत आत्ताच पाहिले राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये महिलांची कामगिरी उल्लेखनीय आहे…सध्या राष्ट्रीय राजकारणात महिलांची संख्या नगण्य आहे…आर्थिक क्षेत्रात पण महिला आघाडीवर आहेत…

संशोधन क्षेत्रात सुद्धा महिलांची संख्या वाढत आहे… स्त्री ही मुळातच परमेश्वराची एक अप्रतिम निर्मिती आहे… स्त्रियांच्या अस्तित्वामुळे साऱ्या जगाला सौंदर्य प्राप्त झालं आहे…
तसं पाहायला गेलं तर आजच्या स्त्रीने तिच्या सर्व बंधनावर मात करून प्रगतीच्या दिशेने घोडदौड सुरू केलेली आहे पूर्वीच्या काळी चूल…मुल…कंगवा नाहीतर स्त्री जन्मा ही तुझी कहाणी पदरात पान्हा आणि नयनात पाणी पण हल्लीच्या काळात या ओळी पुरतच स्त्रीचं अस्तित्व मर्यादित राहिलेलं नाही.

एक काळ असा होता स्त्रीची कर्मभूमी आणि कार्यक्षेत्र हे घराच्या आतच मर्यादित होतं पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये घरात पुरुषांचेच वर्चस्व दिसत होते घरातील कोणतेही निर्णय पुरुषच घ्यायचा स्त्री ने फक्त त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची एवढेच तिच्या हातात होतं त्यावर मत प्रदर्शन पण करता येत नव्हतं विविध कार्यालयात पण स्त्रीया क्वचित दिसायच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाची ही अवस्था मग

उच्च शिक्षणात तर स्त्रियांची अवस्था सांगण्यासारखी नव्हती एवढी बंधनं होती उच्च शिक्षणात फक्त पुरुषांचीच मक्तेदारी होती पण आता काळ बदललाय आताचं दृश्य… आजच्या स्त्रीला कोणतेच क्षेत्र नवीन राहिलेले नाही राजकारण अर्थकारण समाजकारण कौटुंबिक जबाबदाऱ्या सुरक्षा इत्यादी सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रिया समर्थपणे हा भार पेलताना दिसत आहे

आजची स्त्री ही माननीय द्रौपदी मुर्मू बनून देशाचे नेतृत्व करू शकते…लता व उषा मंगेशकर बनून स्वरांवर अधिराज्य गाजवू शकते… कल्पना चावला बनवून सगळं आसमंत कवेत घेऊ शकते… कधी कधी पी टी उषा बनवून जिवाच्या आकांताने धावते…तर कधी मदर तेरेसा बनून त्रासलेल्यांना आपल्या कवेत घेऊन मायेची ऊब देऊ शकते…

वेळ आलीच तर देश रक्षणासाठी झाशीची राणी बनवून युद्धात लढण्यासाठी पण तयार असते… आता बघू नवरात्र मध्ये धार्मिक कारणाबरोबरच स्त्री शक्ती जागराचा उत्सव म्हणूनही पाहिले जाते यातील धार्मिक कार्यक्रमाला असलेल्या अधिष्ठानामागे भक्कम असा शक्ती पूजनाचा संस्कार जोडलेला असतो वेगवेगळ्या रूपातील देवीचे पूजन करताना शक्तीचा आणि मातृत्वाचा गौरव करणे हा भाव दडलेला असतो अजूनही

काही काही गावात सरकारचे महिलांना प्राधान्य म्हणून उपसरपंच सरपंच पदाची धुरा स्त्री च्या खांद्यावर दिली जाते पण थोडासा शिक्षणाचा अभाव आणि पतीचा समाजकारणातील आणि राजकारणातील वावर व प्रतिष्ठा यांच्या जोरावर तिच्या अधिकाराचा अप्रत्यक्षरीत्या त्याच्याकडून वापर होतो व तिला ठाम राहावं लागतं हे चित्र जे कार्य होईल ते ती स्वतःच्या विचारा अंती निर्णय घेईल अशी परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत ही समाज व्यवस्था स्त्री शक्तीचा जागर हा सोहळा साजरा करू शकत नाही

आपण आपल्या ग्रामीण क्षेत्रांमध्ये पाहिलेलं आहे ग्रामपंचायत येथील सरपंच…उपसरपंच… योगायोगाने ग्रामविकास अधिकारी स्त्रीच असते…ग्रामपंचायतीच्या सदस्यांमध्ये बहुतेक जास्त प्रमाणात स्त्रिया…पुरुष क्वचितच…तालुका पंचायत समितीमध्ये सभापती… जिल्हा परिषद अध्यक्ष महिला… आणि गावातील सहकारी सोसायटी मुख्य व कार्यकारी मंडळ बहुतेक महिला चालवतात… गावातली नागरी पतपेढी सर्व महिला…

शिपाई पण महिलाच असतात… जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखेचे मॅनेजर स्त्री…हि त्या तालुक्याची आमदार महिला…खासदार महिला…एवढेच काय शासन दरबारी आपण उठवलेल्या आवाजाची दखल घेण्यासाठी पालकमंत्री सुद्धा महिला… असे चित्र जवा आपणाला पाहायला मिळेल तेव्हा खरोखरीच स्त्री शक्तीचा त्या आदी मायेचा जागर हा सोहळा साजरा केला असे म्हणावे लागेल

**************************************
किरण बेंद्रे
पुणे
7218439002

litsbros

Comment here