लव्हे येथील क्रिकेट स्पर्धेत केम येथील संघाने मारली बाजी; वाचा सविस्तर
केम(संजय जाधव) ;
करमाळा तालुक्यातील लव्हे येथील एन,पी,ग्रुप आयोजित कर्मयोगी चषक भव्य हाफ पिच टेनिस बाॅल किक्रेट स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस व चषक केम येथील जाणता राजा , स्पोर्ट्स क्लब या संघाने पटकावला.
लव्हे येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी एकूण चाळिस संघाने सहभाग नोंदवला होता.
केम येथील जानता राजा स्पोर्ट्स क्लब ने प्रथम क्रमांकाचे पंधरा हजार रूपये बक्षीस व चषक संघाने जिंकला हा चषक शुभम कोंडलकर, व सागर पाटिल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या संघामध्ये बाळासाहेब तळेकर, समीर तळेकर, अभय तळेकर, संदिप तळेकर, लहू तळेकर, पप्पू तळेकर, ज्योतिराम दुर्गळे, बबलू तळेकर, चिक्कू गाडे, शुभम ओहोळ, आकाश अवघडे हे खेळाडू होते.
या संघाने हा चषक पटकावल्या बद्दल माजी सरपंच अजित तळेकर, सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, माजी सभापती शेखर गाडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दसरथ आपा तळेकर सरपंच आकाश भोसले, ऊपसरपंच नागनाथ तळेकर, यानी अभिनंदन केले. तसेच या संघाचे केम येथील ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले आहे.
Comment here