आरोग्यकरमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यात लम्पी आजारामुळे गाईचा बळी; शेतकरी व पशुपालकात खळबळ; पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यात लम्पी आजारामुळे गाईचा बळी; शेतकरी व पशुपालकात खळबळ; पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप

करमाळा(प्रतिनिधी) करमाळा तालुक्यात लम्पी या जनावरांच्या स्कीन आजारामुळे पहिल्या जर्सी गाईचा मृत्यू झाला आहे. लंपी आजारामुळे झालेला करमाळा तालुक्यातील हा पहिल्या जनावराचा मृत्यू आहे.

करमाळा तालुक्यातील राजुरी गावातील पशुपालक निलेश दुरंदे यांच्या जर्सी गाईचा मृत्यू करमाळा तालुक्यात शेतकरी वर्गात व पशुपालकात खळबळ उडवून देणारा आहे.

11 सप्टेंबर 2022 पासून आमची जर्सी गाय आजारी होती ती त्या आजाराचे पशुवैद्यकीय अधिकारांकडून योग्य निदान न झाल्याने व योग्यवेळी योग्य उपचार न मिळाल्यामुळे गाईचा दीड लाख रुपये किमतीच्या गायीचा मृत्यू झाला असल्याचा आरोप पशुपालक दुरंदे यांनी केला आहे.

तसेच राजुरी गावातील आणखी सहा ते सात जनावरे लांबी सदृश्य आजाराने ग्रस्त असल्याचे दिसून येत आहे व लोकांकडून तसेच सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच योग्य काळजी घेऊन आपल्या पशुधन वाचवले पाहिजे.

litsbros

Comment here