लक्ष्मीपूजन उत्साहात व आनंदात संपन्न

लक्ष्मीपूजन उत्साहात व आनंदात संपन्न

केत्तूर (अभय माने) संपूर्ण करमाळा तालुक्यासह तालुक्याच्या पश्चिम भागातील उजनी लाभक्षेत्र परिसरात दिवाळीतील लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहात व फटाक्यांची आतिषबाजी करून साजरे करण्यात आले. आपल्या जीवनात आनंद,सुख-समृद्धी व भरभराट घेऊन आलेला सण म्हणजे दिवाळी सण.या दिवाळीमध्ये महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन घरोघरी सहकुटुंब लक्ष्मीचे पूजन करण्यात आले.

शुक्रवार (ता.1) रोजी सायंकाळी 6.01 पासून ते रात्री 8.32 मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजनासाठी शुभमुहूर्त असल्याने या वेळेत सहकुटुंब लक्ष्मी पूजन करण्यात आले.यावेळी बच्चे कंपनी तसेच तरुणांनी फटाक्याची आतषबाजी केली.व लक्ष्मीपूजन आनंदात व उत्साहात संपन्न करण्यात आले.

हेही वाचा – क्षितिज महिला ग्रुप कडून श्रीराम प्रतिष्ठानच्या लाभार्थ्यांना दिवाळी फराळ वाटप

महाफीड कंपनीकडून संगम शाळेस रंगरंगोटी व बोलक्या भिंती करण्यासाठी मदतनिधी

लक्ष्मीपूजनासाठी लक्ष्मीच्या फोटोसमोर लाह्या, बत्ताशे,हळद कुंकू,रोख रक्कम,नाणी,झेंडूची फुले याबरोबरच गोड पदार्थ ठेवण्यात आले होते.यावेळेस लक्ष्मीपूजन करून फटाक्याची आतषबाजी करण्यात आली.व मनोभावे पूजा करण्यात आले.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line