आरोग्यकुर्डुवाडीक्राइम

कुर्डुवाडीतील कोरोना पाॅझिटिव्ह पाच व्यक्तींवर गुन्हा दाखल

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

 कुर्डुवाडीतील कोरोना पाॅझिटिव्ह पाच व्यक्तींवर गुन्हा दाखल

कुर्डुवाडी/ प्रतिनिधी ( राहुल धोका) जिजामाता नगर कुर्डुवाडी ता माढा येथील पाच कोरोना संक्रमित व्यक्तिंवर संस्थात्मक काॅरंटाईन न होता घरीच राहिले त्यामुळे नगरपरिषद आरोग्य निरिक्षक तुकाराम पायगण यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. 

या बाबत अधिक माहिती अशी दि २१ मे व २३ मे च्या तपासणी मध्ये जिजामाता नगर कुर्डुवाडी येथिल एकाच घरातील पाच व्यक्ति कोरोणा संक्रमित आढळल्या आहेत जिल्हाआधिकारी सोलापुर यांच्या आदेशा प्रमाणे कोरोना पाॅझिटिव्ह व्यक्तिंना संस्थात्मक विलगीकरण अथवा रुगणालयात दाखल होणे गरजेचे आहे. 

होम काॅरंटाईन राहण्यास मनाई आदेश असल्याने दि २१ मे ते २५ मे पर्यंत वांरवार सांगून हि सदर व्यक्ति संस्थात्मक काॅरंटाईन होत नसल्याने आखेर त्यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. 

litsbros

Comment here