आरोग्यकुर्डुवाडीसोलापूर जिल्हा

कोविड परिस्थितीत राज्यातील नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांसाठी किमान 10 टक्के बेड राखीव ठेवा.!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कोविड परिस्तिथीत राज्यातील नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांसाठी किमान 10 टक्के बेड राखीव ठेवा.!

कुर्डुवाडी(राहुल‌ धोका) ; गेल्या वर्षभरापासून राज्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या नगरपरिषद कर्मचारी, अधिकारी व त्यांचे कुटुंबीयांना ऑक्सिजन व व्हेंटेलेटर बेडसाठी राज्यात सर्वत्रच वणवण करावी लागत आहे. या सेवकासाठी प्रशासनाने कोविड रुग्णालयात किमान 10 टक्के बेड राखीव ठेवावे.

प्रत्येक रुग्णालयात किमान 5 व्हेंटिलेटर बेड राखीव ठेवण्याची मागणी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद/नगरपंचायत अधिकरी/कर्मचारी संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकरी यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

राज्यातील नगरपरिषदेतील यंत्रणा कोरोना आटोक्यात आणण्यासाठी राज्यातील इतर पोलीस कर्मचारी, अधिकारी आरोग्य कर्मचारी यांच्याच खांद्यालाखांद्या लावून झटत आहे राज्यामध्ये नगरपरिषदेचे 3 लाखाच्या वर कर्मचारी कोरोनाशी दोन हात करत असून आत्ता पर्यंत राज्यात हजारोच्या घरात नगरपरिषदेतील कर्मचारी हे कोरोना बाधित झाले आहेत तर 30 च्या वर कर्मचारी हे कोरोनाच्या काळात आपले कर्तव्य बाजवत त्यांच्या या आजाराने मृत्यू झाले आहेत. त्यांच्या कुटुंबियांना देखील या आजाराच्या संसर्गाचे प्रमाण वाढले आहे.

तेव्हा राज्यातील सर्वच नगरपरिषदेतील कर्मचारी यांच्यासाठी ज्या त्या ठिकाणच्या कोविड रुग्णालयात किमान एकूण बेडच्या 10 टक्के बेड हे पालिका कर्मचारी यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांना राखीव ठेवावेत आणि किमान 5 व्हेटलेटर बेड राखीव ठेवावेत शिवाय त्यांचा उपचार हा पूर्णपणे मोफत करावा अथवा ते कर्मचारी ज्या नगरपरिषदेतील आहेत, त्या नगरपरिषदेकडून थेट करण्यात यावा अशी मागणी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे सचिव दत्तात्रय गायकवाड आणि बार्शीचे अध्यक्ष नितीन शेंडगे यांनी केली आहे.

हेही वाचा-दत्तकला शिक्षण संस्थेची कोविड सेंटर व लसीकरणसाठी इमारत व 50 बेड देण्याची तयारी; जिल्हाधिकाऱ्यांना मागितली परवानगी

लॉकडाऊनमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पुणे जिल्हा परिषदेत ‘या’ 140 जागांची भरती, क्लिक करून वाचा सविस्तर

सदरच्या निवेदनावर जयपाल वाघमारे आनंद कांबळे रवींद्र कांबळे सुदर्शन साठे,बंडू जाधव बापू खिलारे यांनीही स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

litsbros

Comment here