कुंभेजच्या बागल विद्यालयात झाडांना क्यु आर कोड.
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त जैवविविधता संवर्धन उपक्रम.
यशकल्याणीच्या वतीने विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रे व प्रोत्साहनपर बक्षीसे मिळणार.
केत्तूर (अभय माने) कुंभेज (ता. करमाळा) येथील दिगंबरराव बागल माध्य. विद्यालयात 22 एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमंत पाटील या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र शासन व पर्यावरण विभागाने केलेल्या आवाहनानुसार विद्यालयात हा वसुंधरा दिन आयोजित करण्यात आला होता. मुख्याध्यापकांचे मार्गदर्शनाखाली हा उपक्रम करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयातील पर्यावरणप्रेमी शिक्षक कल्याणराव साळुंके यानी विद्यार्थ्याना क्यु आर कोड ,वृक्षांचे महत्व आणि विद्यार्थ्यांची संवर्धनातील भूमिका या बाबी स्पष्ट केल्या. तसेच स्वतः तयार केलेली कृत्रीम घरटयांचे मॉडेल दाखवण्यात आले.
तसेच मुख्याध्यापक पाटील यांनी विद्यार्थ्यांना सद्यस्थिलीत सर्वांनी पक्ष्यांसाठी आपापल्या घराजवळ पाणी पिण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन केले तसेच पर्यावरण रक्षणात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना यशकल्याणीनेचर कॉन्झर्वेशनच्या वतीने शालेय साहित्य प्रोत्साहन भेट देण्यात येईल व सहभागी झालेल्या सर्वांना प्रशस्तीपत्रक देण्यात येईल असे जाहीर केले.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापक हनुमंत पाटील यांनी मार्गदर्शन केले , यावेळी पक्षीनिरीक्षक कल्याणराव साळुंके, सिताराम बनसोडे, संतोष शिंदे, विष्णू पोळ, दादा जाधव, बलभीम वाघमारे, किशोर कदम व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
शहिदांची स्मृती जपणे ही आपली नैतिक जबाबदारी: ॲड. बाळासाहेब मुटके
” विद्यालयात पर्यावरणपूरक विविध उपक्रम राबवत आहोत. शासनाच्या आवाहनानुसार स्वयंसेवी संस्था सहभाग या अंतर्गत यशकल्याणी संस्थेचे सहकार्य घेत आहोत. .विद्यार्थ्यांवर झालेले पर्यावरणीय संस्कार वसुंधरेचे रक्षण करण्यास बळ देतील.
– हनुमंत पाटील,मुख्याध्यापक.” प्रथमतः विद्यालयातील वृक्षांची यादी केली नंतर या वृक्षांची माहिती ऑनलाईन स्रोतांमधून संकलित केली. त्यानंतर सरांच्या मार्गदर्शनानुसार क्यु आर कोड तयार केले. त्यांच्या प्रती काढून नंतर शाळेतील झाडांना चिटकवण्यातi आल्या. हा कोड मोबाइलने स्कॅन करताच महत्वपूर्ण माहिती तात्काळ मिळते.
– साक्षी भोसले,विद्यार्थिनी.” उपक्रमशील शाळा म्हणून बागल विद्यालय सर्वांना सुपरिचित आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवून देण्यासाठी मा.मंत्री स्व. दिगंबररावजी बागल मामा यांचा आदर्श घेऊन आम्ही शाळा विकासासाठी प्रयत्नशील आहोत. कुंभेज,पोफळज ग्रामस्थांचे सहकार्य कौतुकास्पद आहे.
– दिग्वीजय दिगंबरराव बागल.जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा संस्थेचे कार्यकारी विश्वस्त