कुंभेज येथे विद्यार्थ्यांनी घेतली आगळीवेगळी प्रतिज्ञा; वाचा सविस्तर

कुंभेज येथे विद्यार्थ्यांनी घेतली आगळीवेगळी प्रतिज्ञा; वाचा सविस्तर

केत्तूर (अभय माने) कुंभेज (ता.करमाळा) येथील दिगंबरराव बागल विद्यालयात सखी सावित्री समितीची स्थापना करण्यात आली.

यावेळी सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक हनुमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शा. व्य.स. अध्यक्ष धनराज भोसले, आरोग्य अधिकारी कंठाळे , कांबळे मॅडम, पठाण मॅडम तसेच बागल विद्यालयाचे सहशिक्षक कल्याणराव साळुंके, सीताराम बनसोडे, संतोष शिंदे, विष्णू पोळ, दादा जाधव, किशोर कदम, बलभीम वाघमारे, संतोष घोरपडे, नंदकुमार कांबळे, युवराजकादगे, सुमित काटे, यांचेसह सर्व विद्यार्थी वर्ग, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी विद्यालयातील उपस्थित मुलांनी ” मी माझ्यावसमाजातील माता भगिनींचा व सर्व महिला व मुलींचा आदर व सन्मान करेल मुलींच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करीन व इतरांना या साठी प्रेरीत करीन ” अशी प्रतिज्ञा घेतली.

नुकतीच कोलकत्ता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर तसेच बदलापूर येथे झालेल्या अत्याचाराबद्दल प्रशालातर्फे निषेध नोंदविण्यात आला.
नैतिकतेने वागण्यासाठी स्वतःपासून सुरुवात व्हावी या उद्देशाने विद्यार्थ्याकडून ही प्रतिज्ञा म्हणून घेतली गेली.

यावेळी कुंभेज येथील दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालयात स्त्री – सुरक्षा उपक्रमांतर्गत महिला समूपदेशक रूपाली कन्हेरे यांनी मुलींची सुरक्षीतता या विषयावर व्याख्यान दिले. मुख्याध्यापक हनुमंत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी शा. व्य. समितीचे अध्यक्ष धनराज भोसले होते

यावेळी समूपदेशक रूपाली कन्हेरे यांनी स्त्रीशक्तीचा अविष्कार ,स्त्रीयांचे/ मुलींचे समाजातील स्थान आजचे भीषण वास्तव , आपली व्ययस्थाने व बलस्थाने तसेच सर्वसमावेशक दृष्टीकोन या विषयी माहिती दिली तसेच मुलींना सुरक्षाविषयक प्रतिज्ञाही दिली.

हेही वाचा – हिसरे येथील शेतकऱ्याच्या लेकीचे यश; भारत सरकारच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षेत निवड

32 वर्षानंतर उपस्थित राहून माजी विद्यार्थ्यांनी अनुभवली आपली शाळा

मुख्याध्यापक हनुमंत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, शाळा हे समाजाचे प्रतिबिंब असल्याने समाजमनाचा मोठा प्रभाव विद्यार्थ्यांवर होत असतो त्यामुळे विद्यार्थी विकसनासाठी शाळा व समाज यांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे.

यावेळी आरोग्य सेविका कंठाळे यांनी मुलीच्या आरोग्यविषयक समस्या व त्यावरील उपाय याबाबत चर्चात्मक व्याख्यान दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिताराम बनसोडे यांनी केले.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line