उद्या कुंभेज प्रशालेमध्ये वाढदिवस अभिष्टचिंतन व कृतज्ञता समारंभ

उद्या कुंभेज प्रशालेमध्ये वाढदिवस अभिष्टचिंतन व कृतज्ञता समारंभ

केत्तूर (अभय माने) दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालय , (ता. करमाळा) ला महाराष्ट्र शासनाचा ” मुख्यमंत्री माजी सुंदर शाळा स्पर्धेत ” करमाळा तालुक्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल तसेच यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश करे पाटील यांचा वाढदिवस व कृतज्ञता समारंभ कार्यक्रम प्रशालातर्फे आयोजित केला असून, यावेळी भारतीय सैन्य दलातील सुभेदार सचिन पवार यांच्या सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा सन्मान केला जाणार आहे.यावेळी विद्यार्थ्यांंसाठी भविष्यातील संधी यावर करियर मार्गदर्शन केले जाणार आहे.

हेही वाचा – विठ्ठलवाडीचे दोन वर्गमित्र विघ्नेश गव्हाणे व राजवर्धन गुंड होणार डॉक्टर दोघांनाही एकाच मेडिकल कॉलेजमध्ये मिळाला प्रवेश ; आर्या स्कूलचे एकाच वर्गातील माजी विद्यार्थी

जे.के फाउंडेशनच्या रक्तदान शिबिरात १०५ रक्तदात्यांचा सहभाग

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक हनुमंत पाटील हे राहणार आहेत. सदरचा कार्यक्रम 9 सप्टेंबर रोजी दुपारी 2.15 वाजता दिगंबरराव बागल माध्यमिक महाविद्यालयात आयोजित केला आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line