कुंभेजची लेक श्वेता शिंदे हिस ‘बी टेक’ पदवी प्रदान

कुंभेजची लेक श्वेता शिंदे हिस ‘बी टेक’ पदवी प्रदान

केत्तूर (अभय माने) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात पदवी वितरण समारंभ संपन्न झाला. या समारंभात कुंभेज (ता.करमाळा) येथील श्वेता संपतराव शिंदे यांना वनामकृविविच्या वतीने बी टेक ॲग्री इंजीनिअरींग ही पदवी मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आली.

श्वेता शिंदे जिऑग्राफीक इन्फॉर्मेशन अॅण्ड रिमोट सेन्सींग व वॉटर मॅनेजमेंट या विषयात संशोधन करत आहेत. विद्यापिठाकडून प्रोजेक्ट स्टडीजसाठी निवड होऊन त्याबॅंकॉक थायलँडला अभ्यास दौरा करून आलेल्या आहेत.

हेही वाचा – पारेवाडी रेल्वे स्टेशन थांब्याबाबत खासदारांचे ठोस आश्वासन; रेल रोको तुर्त स्थगित मात्र बहिष्काराचा निर्णय मागणी पुर्ण होईपर्यंत ठाम; वाचा सविस्तर

श्री उत्तरेश्वर हायस्कूल मध्ये एस.एस.सी बॅच सन १९९३-९४ माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

त्यांनी विशेष प्राविण्यासह पदवी प्राप्त केल्याबद्दल श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान,अक्कलकोटचे चेअरमन महेश इंगळे, यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा.गणेश करे-पाटील, सा.बां विभाग,पूणेचे उपअभियंता मधुकर सूर्वे, मुंबईचे चार्टर्ड अकाउंटंट अॅड.बाळासाहेब मुटके,श्वेता यांचे वडील करमाळा पंचायत समितीचे माजी उपसभापती,विश्वस्त संपतराव शिंदे पाटील, राजाराम माने, प्रा.बाळकृष्ण लावंड, पक्षीमित्र प्रा. कल्याणराव साळुंके कुंभेज ग्रामपंचायत उपसरपंच संजय तोरमल, यांनी अभिनंदन केले.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line