कुगाव-शिरसोडी पुलाचे काम प्रचंड वेगात चालू….

कुगाव-शिरसोडी पुलाचे काम प्रचंड वेगात चालू….

केत्तूर ( अभय माने) आ. नारायण पाटील यांच्या माध्यमातून कुगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची 11 डिसेंबर 19 रोजी संधी मिळाल्यावर तिनही बाजूने 30 किलोमीटर पाण्याने वेढलेल्या कुगाव गावच्या दळणवळणाचा प्रश्न आमच्यासमोर होता. या गावातुन प्रवाशी वाहतूक पाण्यामार्गेच होते. कुगावला चार जलमार्ग मंजूर आहेत परंतु जलमार्गातील धोके लक्षात घेता आम्ही प्रथम पुलाची मागणी केली. कुगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामसभेत जोडपुलाचा ठराव मंजूर करुन शासन दरबारी कागदोपत्री पाठपुरावा चालु केला.अशी माहिती तत्कालीन सरपंच तेजस्विनी कोकरे यांनी दिली.

कुगाव (ता करमाळा) ते शिरसोडी (ता.इंदापूर ) जोडपूलाचा विषय मार्गी लावण्यासंदर्भात सरपंच ग्रामपंचायत कुगाव पदी कार्यरत असताना पासूनच्या सातत्यपूर्ण केलेल्या सकारात्मक प्रयत्नास सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री तथा इंदापूर चे कर्तव्यदक्ष आमदार दत्तात्रय मामा भरणे व मदनराव नाना देवकाते पाटील मा संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती सह बॅंक लि यांच्या माध्यमातून व सहकार्यातून यश मिळाले.

हेही वाचा – गणेश चिवटे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना पुन्हा भाजपात सक्रिय होण्याचे आदेश

केत्तूरच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेतली श्रीरामपूरच्या आमदारांची सदिच्छा भेट

” कुगाव (ता.करमाळा) ते शिरसोडी (ता.इंदापूर) जोडपुलाला मा. ना.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेत 396 कोटी + ला मंजुरी देऊन 23 ऑगस्ट 24 रोजी भुमीपूजन केले. मे T & T infra Ltd Pune च्या माध्यमातून पुलाचे काम प्रचंड वेगाने चालु आहे. सदर काम 900 दिवसात काम पुर्ण करणेबाबत आदेश आहेत. सदर पुलामुळे पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा जोडला जाणार आहे.
_सौ तेजस्विनी दयानंद कोकरे,माजी सरपंच ग्रामपंचायत कुगाव (ता. करमाळा)

छायाचित्र : कुगाव (ता.करमाळा): करमाळा तालुका व इंदापूर तालुका यांना जोडणाऱ्या उजनी जलाशयावरील पुलाचे काम वेगाने सुरू आहे

karmalamadhanews24: