कोरडा दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना सहानुभूती अनुदान हेक्टरी 50 रुपये व पिकविम्याची 100 % रक्कम शेतकऱ्यांना द्यावेत : यशवंतभाऊ गायकवाड.
केत्तूर (अभय माने ) सोलापूर जिल्ह्यासह राज्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना सहानुभूती हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान व पीकविम्याची 100 % रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
करण्याची मागणी आरपीआय (आ.) गटाच्या वतीने निवेदनाद्वारे तहसीलदार करमाळा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना ईमेलद्वारे कळविले आहे.
पुढे निवेदनात म्हटले आहे की चालूवर्षी दुष्काळाचं भयानक संकट राज्यात आले असताना पावसाने अचानक दाडी मारल्यामुळे,शेतकरी राजा हवालदील झाला आहे .हाता तोंडाशी आलेलं पीक,पाण्यावाचून जळताना पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येत आहे.हि गोष्ट खेद जनक आहे.तर बऱ्याच ठिकाणी प्रमानापेक्षा कमी पाऊस पडल्याने ,नदी,नाले, तलाव,ओढे व विहीरी कोरड्या .पडल्यामुळे , शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे,तर दुसरीकडे अपेक्षित पाऊस न पडल्यामुळे पाण्याची पातळी खोलवर गेली आहे,ही गोष्ट अत्यंत चिंताजनक आहे.तसेच शेतीला जोडधंदा म्हणून पाळलेल्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे शेतकरी अणखीन हतबल झाला आहे.शेतकऱ्याचे खरिप हंगामामध्येच घेतलेल्या पिकावरच अनेक व्यवहार चालतात, परंतु आता पिकचं नाही आलं,ज्याचं आलं तेही जळून चाललं,त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दुःखाची सावट दिसुन येत आहे.
अनेक वर्षांपासून खरिप व रब्बी हंगामात शासकीय / निमशासकीय पिकविमा कंपन्या अनेक वर्षांपासून पिक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची आर्थिक लुट करताना दिसत आहेत, परंतू बऱ्याच वेळा कोणतीही विमा कंपनी शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे पिक विमा देताना दिसून येत नाही,ही अत्यंत खेद जनक बाब आहे.
मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात
विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची केलेली एक प्रकारची फसवणूक आहे.तरी चालू वर्षी कमी पाऊस पडलेल्या ठिकाणी कोरडा दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना सहानुभूती 50 हजार रुपये तात्काळ अनुदान व पीकविम्याची 100 %रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावी ,अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आ कामगार आघाडीच्या वतीने व समविचारी पक्ष.व शेतकऱ्यांना घेऊन शासनाच्या विरोधात धरणे,मोर्चे व रास्तारोकोच्या माध्यमातून शासनाचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करेल अशा इशारा गायकवाड यांनी दिला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते एकनाथ जाधव, साहेबराव विटकर,अतुल नागटिळक,नाना नागटिळक, उपस्थित होते.