करमाळासोलापूर जिल्हा

आ.शिंदे यांच्या हस्ते कोळगाव येथील ट्रांसफार्मर चे उद्घाटन; २०१७ पासून बंद असणाऱ्या सबस्टेशनला मामांनी दिला शॉक; शेतकरी आमदारांच्या कामावर खुश; जगताप-शिंदे जोडीने लावला कामांचा धडाका

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आ.शिंदे यांच्या हस्ते कोळगाव येथील ट्रांसफार्मर चे उद्घाटन; २०१७ पासून बंद असणाऱ्या सबस्टेशनला मामांनी दिला शॉक; शेतकरी आमदारांच्या कामावर खुश; जगताप-शिंदे जोडीने लावला कामांचा धडाका

करमाळा (प्रतिनिधी) ; कित्येक वर्ष सतत विजेचा घोटाळा व लपंडाव सुरू असलेल्या व शेतकरी वैतागलेल्या करमाळा तालुक्यातील सिनाकोळगाव पट्ट्यात 2017 पासून बंद असलेल्या कोळगाव सबस्टेशन मधील 3.15 MVA नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे या कामाचे उद्घाटन आज आ. संजयमामा शिंदे ( विधानसभा सदस्य करमाळा- माढा). यांच्या शुभहस्ते व माजी आ. जयवंतराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

कोळगाव येथील हा ट्रान्सफर बंद झाल्यामुळे गेल्या वर्षी उन्हाळ्यात या भागातील शेतकऱ्यांना फक्त 4 तास वीज पुरवठा होत होता. हा नवीन ट्रांसफार्मर बसविल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने 8 तास वीज मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

यावेळी मा. संतोष सांगळे. ( अधीक्षक अभियंता म.रा.वि.वि.क सोलापूर ) मा. सुरेश कुऱ्हाडे.( कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.क विभागीय कार्यालय बार्शी ), जेऊर विभागाचे उपअभियंता काळे

करमाळा विभागाचे उप अभियंता जाधव तसेच उद्धव दादा माळी, वामनदादा बदे ,तानाजी झोळ , मानसिंग खंडागळे, भरत अवताडे, सुजित बागल, विवेक येवले, नानासाहेब नीळ, राजेंद्र बाबर, एड. अजित विघ्ने , सुभाष हांनपुडे, फिरोज जागीरदार, उमेश मगर ,प्रदीप दौंड,जयराम शिंदे व पूर्व भागातील लाभधारक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

litsbros

Comment here