खरीप हंगामासाठी मोफत बियाणे व खते देण्याची मागणी

खरीप हंगामासाठी मोफत बियाणे व खते देण्याची मागणी

केत्तूर (अभय माने) येणाऱ्या खरीप हंगामात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोफत बियाणे व खते वाटप करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रवक्ते अजित विघ्ने यांनी केली आहे.

मागील वर्षाच्या खरीप आणि रब्बी हंगामात पावसाने निराशा केल्याने राज्यात शासनाकडून दुष्काळ जाहीर करण्यात येऊन दुष्काळी परिस्थितीच्या उपाययोजना जाहीर केल्या गेल्या.

खरीप व रब्बी हंगामातील उत्पन्न शेतकऱ्यांना घेता आले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामात लागवडीसाठी बियाणे व खते मोफत उपलब्ध करून द्यावे. महाराष्ट्राचे पालक म्हणून आपण कार्य करीत आहात याचा आम्हाला अभिमान वाटतो आहे.

हेही वाचा – ‘जग बदलणारा बापमाणूस’ मराठी पुस्तकाचे अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात प्रकाशन; जगदीश ओहोळ यांच्या ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाची जगभर चर्चा !

कुंभेज येथील तरुणाचे यश, महाराष्ट्रातून पाचवा क्रमांक मिळवत पोलीस उपनिरीक्षकपदी निवड

सध्या शेतकरी वर्ग आर्थिक संकटात आला आहे. पिकवलेल्या कांदा, टोमॅटोला योग्य दर मिळत नाही त्यामुळे आर्थिक संकट वाढले आहे. जून 2024 ला जेव्हा पेरण्या सुरू होतील तेव्हा ते पेरणीपूर्वी मोफत खते व बियाणे उपलब्ध करून द्यावी अशी त्यांनी मागणी केली आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
AddThis Website Tools
karmalamadhanews24:
whatsapp
line