खाजगी मोबाईल कंपन्यांच्या दरात भरमसाठ वाढ : ग्राहक बीएसएनएल कडे पुन्हा वळू लागले !
केत्तूर (अभय माने) नुकतेच काही दिवसापूर्वी खाजगी मोबाईल कंपन्यांनी (जिओ, एअरटेल,आयडिया ) आपल्या रिचार्ज दरात मोठी वाढ केल्याने मोबाईल ग्राहक संतप्त झाले आहेत. भारत सरकारच्या भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) ला याचा थेट फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.पुन्हा मोठ्या प्रमाणावर ग्राहक बेसन कडे वळत आहे.
बीएसएनएल कडे इतर मोबाईल कंपन्याकडून पोर्ट करण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे जिओ कंपनीने सुरुवातीला मोफत सेवा देऊन मोठ्या प्रमाणावर ग्राहक आकर्षित केला होता व ग्राहकांना मोबाईल व इंटरनेटची सवय लावली नंतर हळूहळू रिचार्जचे दर सतत वाढवीत ठेवले
आता तर अचानक भरमसाठ वाढविल्याने इतर कंपन्यांनी त्यांची री ओडली आहे.कोणताही रिचार्ज इंटरनेट शिवाय ठेवला नाही.फक्त बोलण्यासाठी रिचार्ज ठेवायला हवा होता सरसकट ग्राहक इंटरनेट वापरत नाही एका घरात सरासरी तीन मोबाईल धरले तरी महिन्याला हजार बाराशे रुपये खर्च होत आहे तो आता जाचक ठरत आहे.
सध्या बीएसएनएलने सुरू केलेले आकर्षक पॅकेज ग्राहकांना भावत आहेत त्यामुळे इतर खाजगी कंपन्या सोडून ग्राहक बीएसएन कडे वळत आहेत.बीएसएनएलनेही आपल्या ग्राहकांना चांगली सेवा देऊन ग्राहक टिकवून ठेवण्याची गरज आहे.