वडिलांच्या स्मरणार्थ नेताजी सुभाष विद्यालय केत्तुरला दिली 51 हजारांची देणगी
केतूर (अभय माने) नेताजी सुभाष विद्यालय केत्तुर नं.2 (ता. करमाळा) येथे बापूजी साळुंखे यांच्या 103 व्या जयंती निमित्त मल्हारी घाडगे म्हणाले ज्ञानदाना सारखे दुसरे पवित्र कार्य नाही आणि अशा पवित्र ठिकाणी प्रशालेतील माजी विद्यार्थी नारायण जगन्नाथ शेंडगे यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ रुपये 51 हजार देणगी दिली ते पवित्र ठिकाणी दिल्याचं समाधान आहे ते पुढे म्हणाले की, बापूजींनी लावलेले छोटेसे रोपटे त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे.
आम्ही याच शाळेत शिकून आमच्या सारखे असे अनेक विद्यार्थी या प्रशालेमध्ये शिकून गेलेली आहेत एक माजी विद्यार्थी नारायण शेंडगे यांनी प्रशालेचे ऋण फेण्यासाठी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ देणगी दिलेली आहे.यावेळी बापूजीच्या कार्याविषयी मुख्याध्यापक शिंदे डी. बी.यांनी माहिती दिली. दिलेली देणगी सत्कारणी लावू असा शब्द दिलेला आहे.
अशा महामारी प्रसंगी मोठी देणगी दिल्या बद्दल संस्था प्रतिनिधी मारुती सोनवणे यांच्या हस्ते नारायण शेंडगे यांचा सत्कार करण्यात आला.
पूतळा पूजन नारायण शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
करमाळयात पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी
यावेळी उपसरपंच चिंतामंणी कानतोडे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक पाटील अजीव सेवक मारुती सोनवणे, मुख्याध्यापक शिंदे डी. बी. पतसंस्था चेअरमन लक्ष्मण महानवर,मल्हारी घाडगे, मारुती भोसले भीमराव बुरुटे दत्ता महानवर भीमराव चौधरी, किशोर जाधवर लक्ष्मण कुंभार सचिन कनिचे व मंगल चौधरी उपस्थित होते. सूत्रसंचालन किशोर जाधवर यांनी केले व आभार मारुती भोसले यांनी मानले.
Comment here