केत्तूर येथे श्री किर्तेश्वर देवस्थानचा कळस रोहनाचा ‘या’ दिवशी होणार भव्य कार्यक्रम
केत्तूर वृत्तसेवा – केत्तूर ता.करमाळा येथील पुरातन हेमाडपंथी श्री किर्तेश्वर देवस्थान हे प्रसिद्ध व जागृक देवस्थान असून श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी दि.११/०९/२०२३ रोजी मंदीराचा कळस बसवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सुप्रसिद्ध किर्तनकार व संत तुकाराम महाराज यांचे आकरावे वंशज कान्होबा नाना महाराज देहूकर यांचा किर्तन सोहळा आहे केत्तूर श्री किर्तेश्वर या देवस्थानचा उल्लेख काशीखंड,शिवलीलामृत,योगवासिष्ठ या पुरातन ग्रंथामध्ये असून श्री किर्तेश्वर देवाची भक्ती केल्याने भक्ताची यश,किर्ती वाढत असल्याची आख्यायिका आहे.दि.०८/०९/२०२३ कळासांची केत्तूर नं १ मधुन हालगी,ढोल,ताशा व मृदुंगाच्या निनादात मिरवणूक काढली होती.सन१९९६ साली या ठिकाणी १३ कोटी नामजप यज्ञ करण्यात आला होता या यज्ञास करवीर पिठाचे तत्कालीन शंकराचार्य विद्याशंकर भारती यांची उपस्थिती लाभली होती.
दि०९/०९/२३रोजी केत्तूर नं २येथे कळसांची मिरवणूक निघणार आहे.तसेच दि. ११/०९/२०२३ रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत किर्तन सोहळा झाल्या नंतर ह भ प नानामहाराज पांडेकर यांच्या हस्ते कलशरोहणाचा कार्यक्रम झाल्या नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.तरी या कार्यक्रमाचा लाभ केत्तूर पंचक्रोशीतील व करमाळा तालुक्यातील ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहन श्री किर्तेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट च्या ट्रस्टींनी केले आहे.