करमाळाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

केत्तुर केंद्राची शिक्षण परिषद पोमलवाडी शाळेत उत्साहात संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केत्तुर केंद्राची शिक्षण परिषद पोमलवाडी शाळेत उत्साहात संपन्न

केतूर (अभय माने); जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोमलवाडी(ता.करमाळा) येथे शनिवार (दि.२३ ) ऑक्टोबर रोजी केत्तुर केंद्राची माहे- ऑक्टोबर ची शिक्षण परिषद केत्तुर केंद्राचे केंद्रप्रमुख विकास काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.

यामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,वेळापूर यांच्या नियोजनानुसार इ.३री,५ वी,८ वी व १० वी अध्ययन निष्पत्ती,NAS च्या अनुषंगाने चर्चा,शाळा सिद्धी,शाळा स्वच्छता कृती आराखडा, निष्ठा,इंस्पायर अवॉर्ड,स्वाध्याय उपक्रम, शाळास्तरावरील ऑनलाईन, ऑफलाईन उपक्रम इ.बाबतीत मार्गदर्शन, आढावा व सविस्तर चर्चा झाली.

तसेच स्वच्छ शाळा,सुंदर शाळा अभियान मध्ये केंद्रातील गोयेगाव,नेताजी हायस्कुल व पोमलवाडी शाळेने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन करण्यात आले.

यावेळी पोमलवाडी गावचे मा. सरपंच संग्राम पाटील, उपसरपंच हनुमंत भोपते, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय भोपते, केंद्रप्रमुख विकास काळे साहेब, तसेच केंद्रातील सर्व माध्यमिक,प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

हेही वाचा – हॉटेलात नाष्टा करायला गेला बाप आणि चाणाक्ष पोलिसांना सापडला मुलाचा खुनी

माढा तहसील कार्यालयासमोर रिपाई आठवले गटाच्या वतीने ‘या’ मागण्यांसाठी आंदोलन

शिक्षण परिषद यशस्वीपणे पार पडण्यासाठी पोमलवाडी शाळेचे मुख्याध्यापक सिकंदर शेख,सर्व शिक्षक वृंद आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

litsbros

Comment here