गुरुवारी केतूर येथे जल जीवन मिशनचा भूमिपूजन समारंभ

गुरुवारी केतूर येथे जल जीवन मिशनचा भूमिपूजन समारंभ

 केतूर(अभय माने); केतूर नंबर एक (तालुका करमाळा) येथील जल जीवन मिशन चे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ गुरुवार (ता. 22) रोजी तालुक्याचे माजी आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते होणार असून यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी राजेभोसले राहणार आहेत.

हेही वाचा – श्री.मकाई सहकारी साखर कारखान्यावर पुनश्च बागल गटाची सत्ता; क्लिक करून वाचा, विजयी व पराभूत उमेदवारांची नावे व कोणाला किती मते मिळाली?

राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो! “आपली जुनीच घराणी बरी, नवा नेता नको..” मकाई निवडणुकीत आजी माजी आमदारांनी बागलांना मदत केल्याची चर्चा

यावेळी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक नवनाथ झोळ, माजी सभापती शेखर गाडे, केमये माजी सरपंच अजित तळेकर, माजी सभापती अतुल पाटील, माजी उपसभापती दत्ता सरडे उपस्थित राहणार आहेत.

अशी माहिती आयोजक व केतूरचे माजी उपसरपंच चिंतामणी कांनतोडे यांनी दिली आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
AddThis Website Tools
karmalamadhanews24:
whatsapp
line