केतूरच्या सरपंचपदी सचिन वेळेकर तर ‘हे’ आहेत इतर विजयी उमेदवार; क्लिक करून वाचा सविस्तर

केतूरच्या सरपंचपदी सचिन वेळेकर तर ‘हे’ आहेत इतर विजयी उमेदवार; क्लिक करून वाचा सविस्तर

केत्तूर (अभय माने) केत्तूर ( ता .करमाळा) ग्रामपंचायतच्या झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच म्हणून सर्वपक्षीय उमेदवार सचिन विठ्ठल वेळेकर यांनी बाजी मारलेली आहे.चौरंगी झालेल्या सामन्यात प्रतिस्पर्धी सुत्यदेव देवकते यांचा 298 मतांनी पराभव केला.

सुरूवातीलाच दोन प्रभागातील 5 जागा ( बबन साळवे, रामहरी जराडे, शुभांगी विघ्ने, शहाजी पाटील, प्रियंका नवले हे अविरोध निवडून आले होते.

तर प्रभाग 1 मधून मधून भास्कर कोकणे, सुवर्णा गुलमर, शोभा कांनतोडे व प्रभाग 2 मधून कमल पवार, सुजित पाटील, पूजा कनिचे हे 6 उमेदवार विजयी झालेजाहीर आहेत.

हेही वाचा – उपोषणाचा दुसरा दिवस प्रा.गायकवाड यांना अनेक संघटनांचा पाठिंबा; मकाई शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे कधी देणार?

माढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीच्या महिला उपसरपंचांनी दिला पदाचा राजीनामा; मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी घेतला निर्णय

लोकनियुक्त सरपंच व विजयी उमेदवाराचे सोलापूर जिल्हा दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे संचालक राजेंद्रसिंह पाटील,अँड,अजित विघ्ने, मकाई कारखान्याचे कार्यकारी संचालक हरिश्चंद्र खाटमोडे, करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती बापूसाहेब पाटील,माजी सरपंच देवराव नवले,माजी उपसरपंच लालासाहेब कोकणे,प्रशांत नवले आदिसह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line