मतमोजणीमुळे केत्तूरचा आठवडे बाजार रद्द
केत्तूर (अभय माने) करमाळा तालुक्यातील केत्तूर येथील शनिवार (ता.23) रोजी भरणारा आठवडा बाजार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी असल्यामुळे रद्द केला असल्याची सरपंच सचिन वेळेकर यांनी दिली आहे.
निवडणूक आयोगाने मतदानादिवशी व मतमोजणी दिवशी तालुक्यातील महत्वाच्या गावातील आठवडे बाजार रद्द केले होते त्यानुसार मतमोजणी दिवशी ही आठवडा बाजार रद्द करण्यात आला आहे.
हेही वाचा – खतरनाक फ्रॉड..! तुमच्याच बँक खात्यात पैसे पाठवून अशा प्रकारे तुमचीही होऊ शकते फसवणूक!
परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने राजुरीत रक्तदान शिबिर
आठवडा बाजार दिवशी भाजीपाला तसेच इतर खरेदीसाठी नागरिक तसेच बाजार करून येत असतात विधानसभा निकालामुळे काही गडबड गोंधळ होऊ नये यामुळे जिल्हा प्रशासनाकडून बाजार बंद ठेवण्याचे आदेश आले आहेत.
शनिवार (ता.23)रोजी आठवडा बाजार बंद राहणार असला तरी तो रविवार (ता.24) रोजी भरविण्यात यावा अशी मागणी नागरिक, ग्रामस्थ तसेच बाजार व्यापाऱ्यांनी केली आहे.