केत्तूर परिसरात गणरायाचे उत्साहात आगमन: पावसाची विश्रांती

केत्तूर परिसरात गणरायाचे उत्साहात आगमन: पावसाची विश्रांती

केत्तूर ( अभय माने) गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया च्या जयघोषात केत्तूर (ता.करमाळा) परिसरात मोठ्या उत्साहाने गणपती बाप्पाचे आगमन करण्यात आले.पावसाने विश्रांती घेतल्याने उत्साहाला उधाण आले होते.

सकाळी नेताजी सुभाष विद्यालय व महाविद्यालयाचा श्री गणेशा मिरवणुकीने स्थानापन्न झाला त्यानंतर सुयश स्पेशल गार्डन्सचा श्री गणेशा वाजत गाजत स्थानापन्न झाला.त्यानंतर घरोघरी गणेश मूर्ती नेण्याची बालचमूनी गर्दी व गडबड केली होती.शनिवार (ता. 7) रोजी केत्तूरचा आठवडे बाजार असल्याने गणेश मूर्ती मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आलेल्या होत्या.बाजारात विक्रीसाठी आलेल्या गणेशमूर्ती किंमतीने कमी असल्यामुळे ग्राहकांनी या गणेशमूर्ती घेणे पसंत केले.

हेही वाचा – हिसरे येथील शेतकऱ्याच्या लेकीचे यश; भारत सरकारच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षेत निवड

करमाळा बाजार समितीत उडदाची आवक सुरू, यंदा विक्रमी आवक होणार; वाचा किती मिळतोय दर?

दुपारी 1.51 मिनिटापर्यंत गणेशमूर्ती प्रतिष्ठानेचा मुहूर्त असल्याने तत्पूर्वी घरोघरी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.यावर्षी उजनी धरण 100% भरल्याने तसेच पाऊस काळही भरपूर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे दरम्यान सातत्याने पडणाऱ्या पावसाने सध्या विसरांती दिल्याने गणेश भक्तांना गणेश सजावट डेकरिषण, विद्युत रोषणाई करण्यास वाव मिळाला आहे. आज केतूर येथील गणेश मंडळांनी गणेशोत्सव थाटामाटात व विधिवत आणून बसवत आहेत.परिसरात सार्वजनिक गणेशोत्सवाची संख्या कमी झाली असली तरी, बाल गणेश उत्सवाची संख्या मात्र वाढली आहे.

karmalamadhanews24: