केतुर येथे 76 लाख 50 हजार निधीच्या कामाचे माजी आमदार पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

उपस्थित सर्व मान्यवर..

केतुर येथे 76 लाख 50 हजार निधीच्या कामाचे माजी आमदार पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

जेऊर (प्रतिनिधी); जल जिवन मिशन योजने अंतर्गत ग्रामपंचायत केत्तूर नं-१ अंतर्गत ७६ लक्ष ५० हजार इतका निधी मंजूर झाला असून या कामाचा भूमिपूजन व उदघाटन समारंभ. माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

त्यावेळी बोलताना माजी आमदार नारायण पाटील म्हणाले की, भविष्यातील पंचवीस वर्षाचा विचार करून ही जलजीवन योजनेची मंजुरी करण्यात आली असून शासनाचे डोळ्यासमोर एकच उदिष्ट असून प्रत्येक खेडेगावात ही योजना राबवून “हर घर नळ योजनेतून “एकही कुटुंब पाण्यावाचून वंचित राहणार नाही.व ही योजना यशस्वी करण्याचं काम शासनाने केले आहे.

पुढे बोलताना पश्चिम भागातील रस्त्याचे अनेक प्रश्न मी आमदार असताना मार्गी लावले त्यांचबरोबर तुमचा केत्तूर नदीवरील पूल माझ्या कारकिर्दीत पूर्ण करण्याचं पुण्य तुमच्या किर्तेश्वराच्या आशीर्वादाने यशस्वी झालं हे माझं भाग्य.

पुढील येणाऱ्या काळात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे-साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस-साहेब यांच्या माध्यमातून तालुक्यातील विविध कामे मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे.

गेल्याच महिन्यात मुख्यमंत्री साहेब यांना विनंती करून तालुक्यातील रस्त्यांवर आसलेली स्थगिती उठवण्यात आपल्याला यश आलं असुन त्या रस्त्यापैकी केत्तूर 2 ते पोमलवाडी रस्त्यावरील स्थगिती उठल्याने त्या रस्त्याचे काम थोड्याच दिवसात चालू होईल. केत्तूर -2 ते वाशिंबे चौफुला या रस्त्यासाठी सध्या मुख्यमंत्री साहेब व ग्रामविकास मंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा चालू असून हा ही रस्त्याचा विषय लवकरच मार्गी लावू.

त्यावेळी उपस्थितीत आ.स.सा.का.मा.संचालक नवनाथ झोळ,उपसभाती पै.दत्ता सरडे,मा.सभापती शेखर गाडे,मा.सभापती बापूसाहेब पाटील,मा.उपसरपंच छाया शंकर राऊत,श्रीमती साळूबाई पोपट येडे, भीमराव येडे,रामचंद्र कोकणे,राजेश कानतोडे-सर,दादासाहेब कानतोडे,

शहाजी पाटील,विकास जरांडे, बाळासो जरांडे,बाळासो ठणके,नानासो पवार-सर,बाळासाहेब गावडे,शंकर कानतोडे, किराण निंबाळकर,माणिक राऊत, लालासाहेब कोकणे,राजाराम येडे,बाळासाहेब देवकर,राजेंद्र माळवे,शैलेश कानीचे,रामभाऊ कानतोडे,हनुमंत राऊत,छगन कोकणे, बाळासो कोकणे,रामदास राऊत, छगन मिंड,विलास राऊत,बाळासो जरांडे,

आबासो ठोंबरे,दत्तात्र्यय कोकणे, उदय पाटील,सुभाष पाटील,बाळासाहेब भरणे,आबासाहेब येडे,हनुमंत गुलमर, बापूसाहेब कोकणे, डॉ.भानुदास राऊत, रामभाऊ नजरकार,पै.सागर कोकणे, सचिन जरांडे-सर, संतोष कनीचे, श्रीराम मिंड,पृथ्वीराज कानतोडे, धनजी येडे,दीपक वेळेकर,पोपट राऊत,सतीश खाटमोडे,जनार्धन कानतोडे, शहाजी कोकणे, औदुंबर कोकणे,प्रशांत बागल, अमोल पाटील, युवराज देवकर,राजू खटके,अक्षय देवकर,चंद्रकांत देवकाते उपस्थितीत होते.

हेही वाचा – मत देणाऱ्या सभासदांचे रश्मी बागल-कोलते यांनी नुसते भावनिकतेने आभार मानण्यापेक्षा आधी ऊसाची बिले अदा करावित; कुणी केले आवाहन..? वाचा सविस्तर

अखेर केम येथे हैदराबाद-मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस व मुंबई-पंढरपूर या गाड्यांच्या थांब्याला मान्यता; गावात उत्साहाचं वातावरण

तसेच नवनाथ झोळ,उदयसिंह पाटील,नानासाहेब पवार-सर, आबासाहेब येडे यांचीही भाषणे झाली..
कार्यकामाचे सूत्रसंचालन नानासाहेब पवार-सर यांनी केले व आभार श्री. बापूसाहेब पाटील यांनी मानले.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line