करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
केतूरच्या महादेव मंदिरात दर्शनासाठी गर्दी
केतूर (अभय माने) करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील उजनी पाणलोट परिसराच्या काठावर असलेल्या प्राचीन हेमाडपंती महादेव (किर्तेश्वर ) मंदिरात सोमवारी अमावस्यानिमित्त रिमझिम पावसातही सकाळपासून पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी भाविकांनी “हर हर महादेव” ,जय किर्तेश्वर च्या जयघोषात महादेवाचे दर्शन घेतले. श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असल्याने मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी महिला भाविकांचीही उपस्थिती मोठ्या प्रमाणावर दिसून आली.
यावेळी कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले होते. श्रावण महिन्यानिमित्त दर सोमवारी मंदिरात ग्रंथ पारायण, अभिषेक कार्यक्रमपार पडले.
यावेळी किर्तेश्वर तरुण मंडळांने भाविकांसाठी उपवासाचे पदार्थ तसेच केळीचे वाटपही केले
Comment here