केत्तूर-२ येथील खुल्या गटातील क्रिकेट स्पर्धेत ३१ हजाराच्या बक्षिसासह ‘हा’ संघ ठरला अव्वल; ‘या’ उत्कृष्ट खेळाडूंना वैयक्तिक बक्षिसे

केत्तूर-२ येथील खुल्या गटातील क्रिकेट स्पर्धेत ३१ हजाराच्या बक्षिसासह ‘हा’ संघ ठरला अव्वल; ‘या’ उत्कृष्ट खेळाडूंना वैयक्तिक बक्षिसे

केत्तूर ( अभय माने ) कै.लक्ष्मणतात्या कांतीलाल पतुले यांचे स्मरणार्थ येथील कीर्तेश्वर क्रिकेट मंडळातर्फे घेण्यात आलेल्या खुल्या गटातील क्रिकेट स्पर्धेत भिगवन (ता. इंदापूर) या संघाने प्रथम पारितोषिक पटकावले तर कीर्तेश्वर क्लब उपविजेता ठरला.

यातील अन्य क्रमांक पुढीलप्रमाणे-
तृतीय क्रमांक-उंदरगाव क्रिकेट क्लब
चतुर्थ क्रमांक- वाशिंबे क्रिकेट क्लब
आणि पाचवा क्रमांक- पारेवाडी येथील संघाने मिळवला.

बक्षिसांची रक्कम पुढीलप्रमाणे-
प्रथम-31000 रुपये.
द्वितीय-21000 रुपये.
तृतीय-11000 रुपये.
चतुर्थ-7000 रुपये.
आणि पाचवे बक्षीस 5000 रुपये.
तर सर्व क्रमांकासाठी चषक युवा उद्योजक ज्योतीराम ढवळे यांच्यामार्फत देण्यात आले.

बक्षीस वितरण कार्यक्रमावेळी उत्कृष्ट खेळाडूंना वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली.

पैकी मालिकावीर-लखन नगरे( केत्तूर)
सामनावीर-शफिक शेख (भिगवन), उत्कृष्ट गोलंदाज-स्वप्निल नगरे(केत्तूर)

उत्कृष्ट फलंदाज-चेतन काळंगे (बारामती).
उत्कृष्ट पंच-निलेश गरुड.
उत्कृष्ट समालोचक- योगेश कनिचे व महेश राऊत यांना वैयक्तिक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
बक्षीस वितरण कार्यक्रमा वेळी न्यू स्टार क्रिकेटच्या माजी क्रिकेट पटूंचा सत्कार करण्यात आला.

स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कर्णधार अशोक पतुले, उपकर्णधार सचिन राऊत, गणेश शेंडगे ,लुकेश कनिचे,धनीराम पतुले, रामा पतुले, प्रदीप केवटे, लखन नगरे, अक्षय खाटमोडे,सागर पवार, राहुल साळवे,नारायण पतुले ,भालचंद्र गरुड, या सर्वांचे सहकार्य लाभले.

तर अशोक पतुले,सचिन राऊत, निलेश गरुड ,के.सी. जाधवर व एस.एम.हिरवे यांनी पंच म्हणून काम पाहिले.

संपूर्ण सामन्यासाठी सळसळते,कडक आणि धावते समलोचन योगेश कनिचे यांनी उत्कृष्ट पद्धतीने पार पाडले.

हेही वाचा – आदिनाथ साखर कारखान्यातील चोरीचा तपास करा; गुन्हा नोंद झाला पण कुणालाच अटक नाही!

करमाळयात आरोग्य मंत्री प्रा.तानाजीराव सावंत सांगतील तोच आमदार होणार; कुणी केला दावा? वाचा सविस्तर

बक्षीस वितरण कार्यक्रमा वेळी ॲड. अजित विघ्ने,उदयसिंह पाटील, बाबासाहेब मोरे,न्यु स्टार टीमचे कर्णधार शहाजी पाटील, पत्रकार रवींद्र विघ्ने ग्रामसेवक तानाजी येडे,ॲड.संतोष निकम.डॉ. राॅय, युवा उद्योजक सागर पवार, भीमराव चौधरी हे उपस्थित होते.

पावसामुळे दोन-तीन आठवडे चाललेल्या सामन्यांसाठी परिसरातील शेकडो क्रिकेट प्रेमींनी उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश कणिचे यांनी केले तर उपकर्णधार सचिन राऊत यांनी आभार मानले.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line