करमाळाधार्मिकसांस्कृतिकसोलापूर जिल्हा

कोरोनामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर केत्तुरात तुळजापूरहून आणलेल्या ज्योतीचे उत्साहात स्वागत; भक्तिमय वातावरणात घटस्थापना

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कोरोनामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर केत्तुरात तुळजापूरहून आणलेल्या ज्योतीचे उत्साहात स्वागत; भक्तिमय वातावरणात घटस्थापना

केत्तूर (अभय माने) गेली दोन वर्ष कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावानंतर पहिल्यांदाच कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर आता निर्बंर्धाविना केतूर (ता.करमाळा) येथील कीर्तेश्वरी देवीच्या मंदिरामध्ये तुळजापूरहून आणलेल्या ज्योतीचे मोठ्या उत्साही वातावरणात आगमन करून,घटस्थापना करण्यात आली आहे.

केत्तूर (ता.करमाळा) परिसरामध्ये आज सकाळपासूनच देवीच्या आगमनासाठी गावातील नागरिकांसह वरून राजा ही प्रकटला होता.रिमझिम पावसात ज्योतीचे सोमवार (ता.26) रोजी गाववेशित आगमन झाले.

अतिशय आनंदी उत्साही व भक्तिमय वातावरणात देवीच्या ज्योतीचे स्वागत उदयसिंह मोरे पाटील, विठ्ठल कुंभार , अंबादास कनिचे आदींच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर देवीच्या मंदिरात विधिवत पूजा करून मंदिरामध्ये माजी सरपंच उदयसिंह मोरे पाटील व त्यांच्या पत्नी राजलक्ष्मी मोरे पाटील यांच्या उभयतांचे शुभहस्ते घटस्थापना करण्यात आली.

तत्पूर्वी येथील देवींच्या सर्वच भाविक भक्तांनी आदल्या दिवशी मंदिर व मंदिर परिसराची स्वच्छता, रंगरंगोटी करून मोठ्या उत्साही वातावरणात येथील तरुणांनी तुळजापूरहून पायी पळत जाऊन ज्योत सायंकाळी 4 ते 4.30 या वेळेत गावेशित दाखल झाली.

त्यानंतर गावातून वाचत गाजत, फटाक्यांची आताशबाजी करीत मिरवणूक काढून परंपरेनुसार आपापल्या मंदिरात देवीच्या घटस्थापना करण्यात आली.

litsbros

Comment here