केत्तुर 2 मध्ये जल जीवन योजनेचे काम प्रगतीपथावर

केत्तुर 2 मध्ये जल जीवन योजनेचे काम प्रगतीपथावर

केत्तूर ( रवी चव्हाण ) भारत सरकारच्या हर घर जल योजनेनुसार करमाळा तालुक्यातील केत्तूर नं. २ या ठिकाणी जल जीवन योजनेचे काम प्रगतीपथावर चालू आहे उजनी धरणाच्या निर्मितीनंतर करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील जवळ पास 36 ते 40 गावे पुनर्वशीत झाली.

जीगावे पुनरुसित झाली त्यांना अजून पर्यंत मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत त्याचाच एक भाग म्हणून भारत सरकारच्या जल जीवन योजनेतून केतुर नंबर एक व केत्तूर नंबर दोन या दोन्ही गावांमध्ये या योजनेचे काम प्रगतीपथावर चालू असून प्रत्येकाला आपल्या घरी नळाद्वारे हक्काचे पाणी मिळणार आहे.

हेही वाचा – श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रूक मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तक खा. शरद पवार यांच्या हाती; लेखक जगदीश ओहोळ यांनी घेतली शरद पवार यांची भेट

प्रथमता चार ते सहा महिने ट्रायल्स बेसवर हे पाणीपुरवठा योजना सुरू होईल त्यानंतर हि योजना सुरू झाल्यानंतर प्रत्येक नळ धारकाला अनामत रक्कम व वार्षिक दीड हजार रुपये असे भाडे आकारले जाणार आहे. या कामाची पाहणी स्वतः सरपंच सचिन वेळेकर हे जातीने लक्ष घालून करत आहेत त्यामुळे केतूर नंबर दोन मधील रेल्वे स्टेशन व गावठाण या दोन्ही भागाचा पाण्याचा प्रश्न बहुतांशी मिटणार आहे.

karmalamadhanews24: