केत्तूर येथील जल जिवन कामाची चौकशी करण्याची मागणी

केत्तूर येथील जल जिवन कामाची चौकशी करण्याची मागणी

केत्तूर प्रतिनिधी 
केत्तूर नं २ ता करमाळा जि सोलापूर येथील झालेल्या जल जिवन योजनेच्या कामाची चौकशी करण्याची मागणी केत्तूर येथील सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायतचे माजी सदस्य श्री सत्यदेव रामचंद्र देवकते यांनी महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा मंत्री ना गुलाबराव पाटील यांच्या कडे केली आहे.

केत्तूर नं २ येथील जल जिवन मिशन चे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून विहिरीचे काम अपुरे सुध्दा खुदाई व विहीर बांधणी चे बिल ठेकेदार व अधिकारी यांनी संगनमताने मिळवले आहे.तर विद्युत मोटार जुनी वापरले आहे परंतु बिल मात्र नवीन मोटरचे काढले आहे.

गावाअंतर्गत नळ पाणीपुरवठा करण्यासाठी वापरलेली पाईप हे लो क्यावलिटीचे वापरले आहेत.तर पाईप लाईन जेसीबीच्या सहाय्याने खोदल्यामुळे गावातील रस्त्यांची पुरती चाळण झाली आहे.पाऊसाळ्यात गावातील सर्व सार्वजनिक रस्ते पुर्ण पणे चिखल होत असतात.ग्रामपंचायत या योजनेचा ताबा घेऊ नये असे ही श्री देवकते यांनी निवेदनात म्हटले आहे. तसेच पाण्याची टाकी चुकीच्या ठिकाणी बांधण्यात आली आहे.ज्या ठिकाणी टाकी बांधण्यात आली आहे.

हेही वाचा – करमाळा बाजार समितीत उडदाची आवक सुरू, यंदा विक्रमी आवक होणार; वाचा किती मिळतोय दर?

हिसरे येथील शेतकऱ्याच्या लेकीचे यश; भारत सरकारच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षेत निवड

तिथुन संपूर्ण गावात पाणी पुरवठा होऊ शकत नाही.संपूर्ण कामच निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची तक्रारीत म्हटले आहे.या तक्रारी ची प्रत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,जिल्हाधिकारी सोलापूर,जिल्हा परिषद सिओ, यांना देण्यात आल्या आहेत.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line