आरोग्यकरमाळा

केतूर येथे आरोग्य शिबिरात झाली लहानग्यांची आरोग्य तपासणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केतूर येथे आरोग्य शिबिरात झाली लहानग्यांची आरोग्य तपासणी

केतूर ( अभय माने) केतूर नं. 2 (ता.करमाळा) येथे आयोजित आरोग्य शिबिरात 0 ते 18 वयोगटातील 762 मुला-मुलीची तपासणी करण्यात आली. कोर्टी आरोग्य केंद्राच्या मदतीने हे शिबिर संपन्न झाले.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता विचारात घेऊन लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे शिबीर जिल्हा परिषद शाळेमध्ये आयोजित करण्यात आले होते.यामध्ये गावातील 0 ते 18 वयोगटातील मुला मुलींचे डॉक्टरांकडून हिमोग्लोबिन,वजन,उंची, कॅल्शियम, हाडांची तपासणी करण्यात आली.

कॅल्शियमची कमतरता असलेल्या मुलांना मास्क, गोळ्या, टॉनिक देण्यात आले.यावेळी आरोग्य अधिकारी डॉ.महेश भताने (केतूर), डॉ.आशिष गायकवाड (वीट),डॉ.वृशाली साके (साडे), डॉ.विठ्ठल हजारे (कोर्टी) यावेळी केंद्रप्रमुख विकास काळे, आरोग्य सेविका संध्या शिरसागर, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांनी सहकार्य केले.

हेही वाचा- जेऊर ग्रामपंचायतीत पुन्हा खळबळ; कुणाला दिलासा? कुणाला धक्का.? वाचा सविस्तर

सोलापूर जिल्हा ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी होईना; लॉकडाऊन बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी काढले ‘हे’ आदेश

litsbros

Comment here