केमसोलापूर जिल्हा

केम येथील वाड्यावस्त्यावर अंधार, बिल न भरल्याने महावितरणचा झटका; लोक व जनावरांचे पाण्याविना हाल

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केम येथील वाड्यावस्त्यावर अंधार, बिल न भरल्याने महावितरणचा झटका; लोक व जनावरांचे पाण्याविना हाल

केम (संजय जाधव); करमाळा तालुक्यातील केम येथील शेतकऱ्यांचे वीज बाकि थकल्यामुळे महावितरण कंपनीने शेतीचा वीज पुरवठा पूर्ण पणे बंद केल्यामुळे वाडया वस्त्यांवर राहणाऱ्या शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी व जितराबासाठी पाण्यासाठि शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

या मध्ये काय अपघात झाल्यास याला जबाबदार कोण राहणार? असा संतप्त सवाल शेतकरी विचारत शेतकरी बील भरायला तयार आहेत पंरूतु दोन तास का होईना वीजपुरवठा चालू करा आणी बिल वसुली करा म्हणजे आमच्या जनावराना व आम्हाला पाणी घेता येईल असी भावना शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे .

सोमवार पासून केम येथील निमोणी मळा,बिचीतकर वस्ती लोंढे वस्ती पटाड शिवार चांभार वाडि येथील वाडया वस्यावरील वीजपुरवठा बंद केला वस्यारील नागरिक गेले तीन दिवस अंधारात राहत आहे आता राकेल बंद झाल्याने अक्षरक्षा शेतकरी अंधारात आहेत.

गेले तीन दिवस झाले जनावरे पाण्यावाचून तरफडत आहे सात परसाच्या विहरीतून शेतकरी पिण्यासाठी पाणी जीव धोक्यात घालून पाणी आणावे लागते ईतकि भयानक अवस्था झाली शेजारील माढा तालुक्यातील गावात दोन तास वीज पुरवठा आहे आणी करमाळा तालुक्यात असे का? असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहे परवा पाऊस झाल्यामुळे निसर्गाने पिकाला पंधरा दिवस का होईना आधार दिला आहे. शेतकरी वीज बिल भरायला तयार आहेत पण त्यांची एकच मागणी आमच्यासाठि नाहि पंरूतु जितराबा च्या पाण्यासाठी दोन तास वीज पुरवठा करा असी शेतकऱ्यांनी कळकळीची विनंती केली.

हेही वाचा – Solapur Accident : स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन परतताना जीपला अपघात, पाच जणांचा मृत्यू

बेरोजगार आहात.? कमी भांडवलात ‘हा’ व्यवसाय करा आणि कमवा लाखो रुपये

या बाबत महावितरण अधिकारी परीट साहेब यांच्या कडे विचारणा केली असता शेतकरी बिल भरत नाही, त्यामुळे आम्हाला वीज पुरवठा बंद करावा लागतो. दोन तास वीजपुरवठा करा असे म्हटले तर सोडतो अशी ऊत्तरे दिली जातात, पण वीज पुरवठा सुरू करत नाहि तीन दिवस झाले शेतकरऱ्याचे हाल होऊ लागले आहेत.

litsbros

Comment here