केमशैक्षणिकसोलापूर जिल्हा

श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम या ठिकाणी वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम या ठिकाणी वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

केम – श्री उत्तरेश्वर जुनियर कॉलेज केम या ठिकाणी आज वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी प्रमुख पाहुणे महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी व गझलकार श्री नवनाथ खरात ,केम ग्रामपंचायतचे सन्माननीय सदस्य श्री अनंता तळेकर , शालेय शिक्षण समिती अध्यक्ष श्री मोहनआबा दौंड तर अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री विष्णू कदम हे उपस्थित होते.


यावेळी प्रथम परमपूज्य डॉ.बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली . त्यानंतर डॉ.अब्दुल कलाम यांचे प्रतिमापूजन करण्यात आले . त्यानंतर श्री उत्तरेश्वर जुनियर कॉलेजमधील विद्यार्थी श्री आनंद कोरे , कु. निशा डांगे, कु. संध्या वायभासे ,कु.भाग्यश्री मेहेत्रे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले .

यावेळी प्रमुख पाहुणे श्री नवनाथ खरात सर यांनी डॉ.अब्दुल कलाम यांच्या जीवनातील आदर्शवाद सांगून विद्यार्थ्यांना आपले आदर्श ध्येय गाठण्याचा सल्ला दिला. यावेळी त्यांनी विविध ग्रंथातील उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले . या नंतर श्री अनंता तळेकर यांनी आपल्या मनोगतात या कॉलेजच्या उपक्रमाबद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या .

आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य कदम सर यांनी विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती व वाचनाचे महत्त्व समजावून सांगितले . या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे श्री नवनाथ खरात व श्री अनंता तळेकर यांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या ग्रंथासाठी प्रत्येकी पाचशे रुपये वर्गणी दिली . यावेळी या कार्यक्रमास प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरे , प्रा.संतोष साळुंखे , प्रा.संतोष रणदिवे , प्रा.अमोल तळेकर , श्री सरफराज मोमीन सर हे उपस्थित होते .

हेही वाचा – वृद्ध दाम्पत्याची विष पिऊन आत्महत्या, शेतात झाडाखाली आढळले मृतदेह: सोलापूर जिल्ह्यातील घटना

शेतकऱ्यांना सुवर्णसंधी ; ट्रॅक्टर खरेदीवर 50% अनुदान, शेतीची मशागत आता अधिक सुलभ

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. कल्याणी राऊत व कु. पुजा वायभासे हिने केले तर प्रास्ताविक कु.नम्रता शिंदे हिने केले. कार्यक्रमाचे आभार कु. सोमनाथ देवकर यांनी मानले. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम घेण्यात आला.

litsbros

Comment here