करमाळाकेमधार्मिकसोलापूर जिल्हा

केम येथे ग्रामदैवत श्री उत्तरेश्वराचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केम येथे ग्रामदैवत श्री उत्तरेश्वरचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात

केम (प्रतिनिधी संजय जाधव) ; केम येथील ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर चा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. श्रावणी सोमवार निमित्त सालाबाद प्रमाणे पालखी काढायची प्रथा आहे पहाटे साडेपाच वाजता श्री उत्तरेश्वर आरती झाली पहाटेपासून श्रीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती आलेल्या हजारो भाविकांना मसाला दूध वाटप करण्यात आले.

सकाळी साडेआठ वाजता शिवलिंगला फूल लावण्यात आले यावेळी हर हर महादेव उत्तरेश्वर महाराज की जय अशी गर्जना होत असताना फुल गावाकडे पडले त्यानंतर पालखी सोहळ्याची तयारी करण्यात आली या पालखी सोहळ्याचा मान दौंड बंधूला आहे.

दौंड बंधूचे वतीने पालखीची सजावट करण्यात आली त्यानंतर पालखीची आरती झाली व पालखी सोहळ्याला सुरुवात झाली या पालखी सोहळ्यामध्ये सैराट हलगी पुट्टा बँड तुताऱ्या असी वाद्य होती बोला हर हर महादेव श्री उत्तरेश्वर महाराज की जय नाम घोषाने संपूर्ण केम नगरी दुमदुमून गेली होती छबीन्याच्य मार्गावरून पालखी सोहळा सुरू झाला पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी जागो,जागी गदीं केली होती

संपूर्ण पालखी मार्गावर रांगोळी काढण्यात आली होती या पालखी सोहळ्यात लहाना पासून ते जेष्ट नागरिका पर्यंत भाविक सहभागी झाले होते व्यापारी वर्गाने आप,आपली दुकाने बंद करून पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.

पालखी सोहळ्यातील भाविकाना ग्रामस्थांच्या वतीने मसालादूध,चहा,वाटप करण्यात येत होता पालखी गावातील सर्व बंधुना भेट दिली या मध्ये दक्षिणेश्वर,केमेश्वर,मदनेश्वर,बसमेश्वर,भेट देऊन येथील आरती घेऊन पालखी गांधी चौकातून माळी गल्ली येथील तिन खणीत पालखी विसावा साठी थांबली हि मिरवणूक तब्बल सह तास चालली साडे तीन वाजता पालखी सोहळा मंदिरात पोहचला मंदिरात पालखी ठेवण्यात आली.

त्यानंतर श्री ऊत्तरेश्वर बाबाची आरती झाली त्यानंतर आलेल्या पालखी सोहळ्यातील सर्व भाविकाना महाप्रसाद म्हणून शाबूचे वडे वाटप करण्यात आले या पालखी सोहळ्यात श्री ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे सर्व सदस्य महंत जयंतगिरी महाराज ऊपस्थित होते.

litsbros

Comment here