केम येथील श्री उत्तरेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

केम येथील श्री उत्तरेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

केम प्रतिनिधी – श्री उत्तरेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय केम मध्ये शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्याचे पूजन आणि पुष्पहार अर्पण प्रशालेतील माजी शिक्षक के. आर सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री वसंत तळेकर सर,उपाध्यक्ष सचिन रणशृंगारे,विजयकुमार तळेकर,यांची विशेष उपस्थिती होती. स्वामी विवेकानंद प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सचिन रणशृंगारे यांच्या हस्ते करण्यात आले.शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या रथाचे पूजन व उद्घघाटन शालेय व्यवस्थापन समितीची सदस्य विजयकुमार तळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.केम परिसरात प्रभातफेरी काढण्यात आली.शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांचा विजय असो या घोषणेने केम परिसरात चैतन्य निर्माण झाले.

हेही वाचा – सापटणे भोसे येथील सुषमा हनुमंत राऊत हिची जलसंपदा विभाग कॅनॉल निरीक्षक (INSPECTOR) पदी निवड

वक्ते जगदीश ओहोळ लिखित ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाचा इस्लामपुरात गौरव; लोकशाहीर आण्णाभाऊ साठे साहित्यरत्न राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांनी डॉ बापूजी साळुंखे यांच्या कार्यावर भाषणे केली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष सी.जी दोंड यांनीही शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांचे कार्य विद्यार्थ्यांना सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री के.एन वाघमारे सर यांनी केले.यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि केम पंचक्रोशीतील ग्रामस्थ सहभागी होते.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line