श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केम या ठिकाणी “आजची स्त्री-अबला नव्हे ,सबला ” हा काव्य जागर कार्यक्रम संपन्न
केम प्रतिनिधी – श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केम या ठिकाणी आजची स्त्री-अबला नव्हे ,सबला हा काव्य जागर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थिनींनी आजची स्त्री-अबला नव्हे, सबला या अनोख्या अशा विषयावर विविध, रोखठोक, स्त्रियांच्या जीवन जाणिवा असलेल्या काव्यांचे परखडपणे सादरीकरण केले व आजही समाजामध्ये स्त्री ही कणखर असून ती संपूर्ण कुटुंबाचा भार उचलते हे दर्शवून दिले.
हेही वाचा – हिसरे येथील शेतकऱ्याच्या लेकीचे यश; भारत सरकारच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षेत निवड
यशकल्याणीच्या व्यासपीठावर जागतिक किर्तीचे वक्ते निर्माण होतील – प्रा. गणेश करे-पाटील.
यावेळी कु. प्रांजली कळसाईत, कु. राजश्री गायकवाड, कु.सानिका कोळेकर, कु. शीतल कुर्डे , कु. धनश्री पंडित, कु.धनश्री शिंदे , कु. सानिया पठाण या विद्यार्थिनींनी आपापल्या कवितेतून स्त्रियांच्या वरील अन्यायाचा, त्यांच्यावरील जबाबदारीचा आढावा घेतला.
यावेळी प्राचार्य श्री सुभाष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ. मच्छिंद्र नागरे, प्रा.डॉ. संतोष साळुंखे, प्रा. संतोष रणदिवे, प्रा. एस.के.पाटील, प्रा.सतीश बनसोडे यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.