करमाळाशेती - व्यापारसोलापूर जिल्हा

शेतकऱ्यांची पोरं आता केक नाहीतर ‘ही’ फळे कापून करतात वाढदिवस; शेतमालाला उभारी देण्याचा प्रयत्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

शेतकऱ्यांची पोरं आता केक नाहीतर ‘ही’ फळे कापून करतात वाढदिवस; शेतमालाला उभारी देण्याचा प्रयत्न

केम (प्रतिनिधी) ;

स्थानिक शेतकऱ्यांच्या कलिंगडाला कमी दर मिळत आहे. त्यामुळे केकला महागडा खर्च न करता अशी फळे विकत घेऊन ती कापून वाढदिवस साजरा केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास हातभार लागेल, या उद्देशाने केम येथे गणेश तळेकर यांचा वाढदिवस कलिंगड कापून मित्र परिवाराच्या वतीने धर्मवीर संभाजी चौक येथे साजरा करण्यात आला.

सध्या वाढदिवसाला केक कापण्याचा ट्रेंड वाढत चाललेला आहे. केक खाण्यापेक्षा तोंडाला लावणे, क्रीम न खाणे असे करून तो केक खाण्यापेक्षा अधिक वाया जातो.

लॉकडाऊनमध्ये अनेक लोकांनी उदरनिर्वाहासाठी विविध प्रकारची शेती करण्यास सुरुवात केली. कलिंगडाची लागवड सध्या बऱ्याच लोकांनी केली आहे; पण आता कलिंगडाला दर खूपच कमी प्रमाणात मिळत आहे.

त्यामुळे प्रत्येकाने केक ऐवजी कलिंगड किंवा इतर कोणतेही फळ कापून आपला वाढदिवस साजरा केला तर प्रत्येक दिवशी अनेक फळे ही विकली जाऊ शकतात व त्यांच्या विक्रीमध्ये वाढ होऊन त्यांचा फायदा नवीन शेतकऱ्यांना होऊ शकतो, या विचारातून गणेश आबा तळेकर यांनी केम येथे कलिंगड कापून नवा पायंडा पाडून दिला आहे.

यावेळी प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष संदिप तळेकर, व्यापारी संघटना उपाध्यक्ष सागरराजे तळेकर, पै.शिवाजी भैय्या पाटील, जय शंभूराजे परिवार करमाळा तालुका अध्यक्ष ओंकार भैय्या जाधव, सचिन जाधव, विजयसिंह ओहोळ,विष्णुपंत तळेकर, विजय तळेकर, उमेश पाडूळे, दिपक भिताडे, गणेश नागणे, नामदेव गाडे,ओंकार टोणपे आदी उपस्थित होते.

हेही वाचा-देवीच्या माळावरील एकाला मटका जुगार प्रकरणी करमाळा पोलिसांनी केली अटक

रयत क्रांती संघटनेचे दूध दरवाढीसाठी राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फटके देत आंदोलन

यावेळी बोलताना गणेश तळेकर म्हणाले की, अशा पद्धतीने इतर लोकांनीही वाढदिवस साजरे केले तर नवीन शेतकऱ्यांना उभारी मिळेल आणि समाजात वेगळा संदेश जाईल.

 

 

litsbros

Comment here