केम रेल्वेस्थानका जवळ हैदराबाद-मुंबई एक्सप्रेस लुटण्याचा प्रयत्न

केम रेल्वेस्थानका जवळ हैदराबाद-मुंबई एक्सप्रेस लुटण्याचा प्रयत्न

केम (प्रतिनिधी संजय जाधव); मुंबई हैदराबाद एक्सप्रेस गाडी केम ते ढवळस रेल्वे स्थानका दरम्यान चोरट्याने लाल रंगाचे कापड लावून गाडी थांबल्यानंतर लुटण्याचा प्रयत्न झाला.

 ही घटना 15 जून रोजी रात्रीच्या सुमारास केम रेल्वे स्थानकाजवळ घडली मुंबई हैदराबाद गाडी क्रमांक 22 732 ही गाडी केम येथून साडेनऊ च्या सुमारास ढवळस कडे निघाली होती चोरट्याने रूळावर लाल रंगाचे कापड लावल्याने चालकाने गाडी थांबवली.

 बोगी नं२एस बर्थ मधील महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खिडकीतून हात घालून जोरदार ओढले पंरूतु हे मंगळसूत्र रेल्वे डब्यात पडले त्यामुळे महिलानी आरडाओरडा केला.

 रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस रेल्वे गाडि जवळ येताच चोरटी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले या बाबत रेल्वे सुरक्षा बलाचे उज्वल हाळे यानी कुडूंवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

 कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
AddThis Website Tools
karmalamadhanews24:
whatsapp
line