केममाणुसकीसोलापूर जिल्हा

पूरग्रस्तांसाठी केम येथील तरुण मदतीसाठी धावले :- “आम्ही केमकर” कडून मदतीचा हात, 200 किट्सचा पुरवठा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पूरग्रस्तांसाठी केम येथील तरुण मदतीसाठी धावले; “आम्ही केमकर” कडून मदतीचा हात, 200 किट्सचा पुरवठा

केम प्रतिनिधी:रायगड जिल्ह्यातील महाड,पोलादपुर तालुक्यात अतिवृष्टी मुळे सावित्री नदीला आलेला महापूर आणि दरडी कोसळल्यामुळे सामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. या आपत्तीमुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. पूराचे पाणी जरी कमी झाले असले तरी संसार पाण्याखाली बुडून गेल्याने नागरिकांच्या खाण्या-पिण्याचा प्रश्न कायम आहे.

या नागरिकांना उभारी देण्यासाठी करमाळा तालुक्यातील केमचे सुपुत्र, पनवेल चे कर्तव्यदक्ष तहसीलदार विजयसिंह तळेकर साहेब यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली करमाळा तालुक्यातील केम येथील अध्यक्ष सागरराज तळेकर, समीर तळेकर, सचिन जाधव, ओंकार भैय्या जाधव ,महावीर आबा तळेकर ,गणेश आबा तळेकर, वर्षाताई चव्हाण, अक्षय मालक गोडसे,

पप्पूशेठ तळेकर, राजाभाऊ तळेकर, बालाजी आवताडे, बबलू सुरवसे,शिवाजी भैय्या पाटील,राकेश दोंड, दिपक भिताडे, अभय तळेकर, उमेश पाडूळे, विष्णू पंत तळेकर या तरुणांनी केम येथून एक हात मदतीचा आम्ही केमकर आणि पूरग्रस्तांसाठी मदत या हॅशटॅग च्या माध्यमातून ग्रामस्थांकडून खालील मदत गोळा केली.

किराणा किट 200
फिनेल बॉटल्स 250
साड्या 400
ब्लॅकेट 200
मेणबत्ती 3000
गुड नाईट फास्टकार्ड 300
महिला पॅड 100
तांदूळ 100 बॅग (5 kg)
मास्क 200
बिस्कीट पुडे 1000
लहान मोठ्या मुलांचे ड्रेस 250
सॅनिटायझर 250
कुरकुरे 100

ही मदत केम येथील शिवशंभूभक्त, आम्ही केमकर या नावाने पोलादपुर तालुक्यातील सावित्री नदीकाठच्या सरई गावात,महाड शहरामध्ये वाटप करण्यात आले.
यावेळी महाड पोलिस निरीक्षक गिरी साहेबांनी केम गावातील दानशुरांचे, मदतीसाठी एकत्र आलेल्या “आम्ही केमकर” या तरूणांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असे गौरवोद्गार काढले.

हेही वाचा-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना:अशी आहे, विद्यार्थ्यांना 11 वी व 12 वी साठी वार्षिक 1 लाख रुपये शिष्यवृत्ती देणारी ही योजना

करमाळा तालुक्यातील कोळगावची अल्पवयीन तरुणी ऑनलाईन प्रेमात तरुणाच्या भेटीला पोहोचली भुसावळला आणि मग..

यामध्ये केम गावातील दानशूरांनी सढळ हाताने मदत केली. यामध्ये प्रामुख्याने तहसीलदार विजयसिंह तळेकर साहेब,किंगमेकर अजित दादा तळेकर, महावीर आबा तळेकर,नागन्नाथ तळेकर गुरूजी, सागर राजे दोंड, आनंद शिंदे, संतोष बिचितकर, अच्युत काका पाटील, संदिप तळेकर, कुलदीप व्हटकर साहेब, जालिंदर जाधव साहेब, कालिदास अप्पा तळेकर, संतोष शिंदे, जितेंद्र वासकर, किरण नकाते,तानाजी नाना दोंड,राजाभाऊ तळेकर विद्यालय, श्री उत्तरेश्वर हायस्कूल, नुतन माध्यमिक विद्यालय यांच्या सह अनेक दानशूरांनी सढळ हाताने मदत केली.

litsbros

Comment here