आरोग्यकरमाळाकेम

वेळेत रुग्णवाहिका व उपचार न मिळाल्याने रुग्णांचे जात आहेत जीव; जिल्हा परिषद अध्यक्षांच्या केम गावात आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका आहे धूळ खात पडून; लक्ष कोण देणार का.?

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

वेळेत रुग्णवाहिका व उपचार न मिळाल्याने रुग्णांचे जात आहेत जीव; जिल्हा परिषद अध्यक्षांच्या केम गावात आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका आहे धूळ खात पडून; लक्ष कोण देणार का.?

केम(प्रतिनिधी) ; करमाळा तालुक्यातील केम प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका गाडी ही केवळ सर्विसींग अभावी धूळ खात पडून आहे. ही रुग्णवाहिका जर सुस्थितीत असती तर 27 मे या दिवशी सर्पदंश झालेली विवाहित महिला पूजा जाधव ही वाचली असती. तरी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे साहेब यांनी जातीने लक्ष घालून ही रुग्णवाहिका दुरुस्त करून घ्यावी आणि अजुन एक नवीन ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केम येथील नागरिकांतुन होत आहे.

करमाळा तालुक्यातील केम हे सर्वात मोठे गाव असून यामध्ये 17 गावे जोडली आहेत. केम हे गाव तालुक्यातील अडवळणी टोकावर आहे.
दिनांक 27 मे या दिवशी पूजा जाधव ही महिला स्वयंपाकाच्या चुलीसाठी सरपण आणण्यासाठी पठाड शिवारात गेली असता तिला सर्पदंश झाला होता. यानंतर केम येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी दाखल केले होते.

डॉ संतोष पालखे यांनी उपचार करत होते . परंतु सर्पदंशावर उपचार साठी आवश्यक उपकरणे, साहित्य याचा केम येथे अभाव आहे. यामूळे डॉक्टर पालखे यांनी पेशंट ला पुढील उपचारासाठी करमाळा येथे तत्काळ न्यायला सांगितले. परंतु कोरोना चा काळ असल्याने गावात कोणीच जीप भाड्याने दिली नाही. दवाखान्यातील ॲम्ब्युलन्स तर बंद पडली आहे. शेवटी संपत जाधव गॅरेजवाले यांनी स्वतः च्या बुलेट गाडीवर करमाळा येथे उपचारासाठी दाखल केले. 

हेही वाचा- अंत्यसंस्कारानंतर सोनं शोधण्यासाठी लोक चोरून नेत आहेत, राख व अस्थी! लोणी काळभोर मधील धक्कादायक प्रकार

‘या’ सुविधा वाढविण्यासाठी करमाळा कुटीर रुग्णालयाला 60 कोटी निधी द्या; नारायण पाटील

करमाळा येथील डॉक्टरांनी पेशंट ला वाटेतच मृत्यू झाला असे घोषित केले. केम येथे ॲम्ब्युलन्स सुस्थितीत असती तर या गरीब विवाहितेचा जीव वाचला असता. याबाबत केम प्राथमिक आरोग्य केंद्र चे वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष पालखे यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की ही ॲम्ब्युलन्स गेली 7महिने सर्विसींग अभावी धूळ खात पडून आहे.

याबाबत गाडी सर्विसींग साठी संबंधित अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे, परंतु सर्विसींग झाली नाही. तरी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी यामध्ये काहीही करा पण केम साठी 2 ॲम्ब्युलन्स तत्काळ द्याव्यात अशी मागणी केम येथील नागरिकांतुन होत आहे.

litsbros

Comment here