करमाळासोलापूर जिल्हा

केम येथे पारंपरिक सोंगांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न; कोरोना काळानंतर गावात नवा जोश

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केम येथे पारंपरिक सोंगांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न; कोरोना काळानंतर गावात नवा जोश

केम (प्रतिनिधी संजय जाधव) ; करमाळा तालुक्यातील केम येथे पारंपारिक सोंगाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गेले दोन वर्ष झाले कोरोनामुळे हा कार्यक्रम बंद झाला होता पंरूतु या वर्षी कोरोना संपल्यामुळे या वर्षी तळेकर गल्लीच्या वतीने पारंपारिक पद्धतीने एकूण सहा गाडया काढण्यात आल्या हि पंरपरा पुरातून काळापासून सुरु आहे.

ती पंरपरा अजून हि तरूणानी जिंवत ठेवली दुपार पासून तळेकर गल्लीतील तरूण मंडळी सोंगाच्या गाडया काढण्यासाठी तयारी करत होती या मध्ये या मध्ये ज्या गाडित जी पात्र आहेत त्या प्रमाणे गाडयाची सजावट करणे शिवाजी महाराज, झाशीची राणी या गाडित घोडे बांधणे असी कामे तरुण मंडळि करत होते.

सायंकाळी सातच्या पुढे प्रत्येक कलाकाराने पात्र घेतल्या प्रमाणे त्याची रंगभरणी करण्यात आली कोकणातील दशावतार आणी क्षेम नगरीतील श्रावणी सोमवारची बहुरंगी सोंग, एक जातकुळी ऐतिहासिक प्रसंग रामायण महाभारत,कालीन दृश्य, छ्त्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे जीवनचरित्र, प्रसंगझाशीची राणी अॅग्रेंज औरंगजेब, आदिलशहा, असी सर्वकालीन पात्र सोमवारी आवतिंण होतात.

गोमुच्या संगतित हि मनोरंजनाची खिचडी लगबघ असते. श्रावणी सोमवारी केम गावची जुनी परंपरा सोंग असी लोकधारा जी कुठेहि पाहयला मिळणार नाही. गोमुची गाडयात शंभु तळेकर, ओंकार टोणपे, आर एन तळेकर, यश तळेकर, दादा सुर्यवंशी, शंभु वाघमारे ओम मस्तूद आदिनी पात्र घेतले होते.

राम,रावणाची गाडि. या मध्ये भार्गव तळेकर, श्री हरि तळेकर, मद्श गायकवाड,सागर कांरडे, विक्रम तळेकर, भैय्या वागणे. झाशीची राणी. या गाडिमध्ये दयानंद तळेकर, सुर्यकांत तळेकर,राहुल तळेकर, राजेंद्र तळेकर, विक्रम, तळेकर, शिवाजी तळेकर, अभय तळेकर शिवाजी व अदिलशहा. या मध्ये ऊदय तळेकर, राहुल तळेकर, सागर तळेकर, तळेकर,


संभाजी महाराज या मध्ये. वसंत तळेक सर, अनिल तळेकर, शिवराज तळेकर. कौरव,पांडव. या मध्ये सुरथ तळेकर, दत्तात्रय तळेकर, मनोज व्होटकर, राजेंद्र बिभीषण तळेकर, मद्न तात्या तळेकर या कलाकरानी पात्र घेतल.

त्यानंतर सगळ्यात शेवटि श्री ऊत्तरेश्वर महाराजाचा रथ असतो चार हि सोमवारी गावातून रथ निघतो सोंग पाहयला केम व परिसरातील खेड्या तील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असतात हा सोंगाचा कार्यक्रम गावात एक एकात्मिक प्रतिक या मध्ये सर्व समाज सहभागी झाला होता या सोंगाच्या गाड्यांसाठी भगवा रक्षक जाणता राजा स्पोर्ट क्लब, व तळेकर गल्लीतील सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

litsbros

Comment here