आरोग्यकरमाळाकेम

केम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रच सलाईनवर.!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रच सलाईनवर.!

उपळवटे (प्रतिनिधी): संदीप घोरपडे

करमाळा तालुक्यातील केम प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चार उपकेंद्रे येतात. या उपकेंद्रांतर्गत सतरा गावे येतात. या गावांतील सुमारे सत्येचाळीस हजाराच्यावर लाेकांच्या आराेग्याची धुरा ही करमाळा तालुक्यातील केम प्राथमिक आरोग्य केंद्रा वरती आहे. ही बाब लक्षात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा मंजूर आहेत. मागील अनेक महिन्यांपासून पासून एकच डाॅक्टर कार्यरत आहेत.

याचबरोबर अनेक कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. वेळोवेळी तक्रार करून देखील याची दखल घेतली जात नाही. आता पावसाळा सुरू झाला आहे, पावसामुळे वातावरणात बदल होऊन रुग्णांची संख्या वाढते. याचा फटका परिसरातील गाेरगरीब रुग्णांना बसणार आहे.


याचबरोबर
प्रा. आ. केंद्र केम अंतर्गत एकूण 22 पदे असून त्यापैकी 14 पदे रिक्त आहेत.
रिक्त पदे
1) आरोग्य सहाय्यिका – 1
2) आरोग्य सेविका – 4
3) आरोग्य सेवक – 3
4) औषध निर्माण अधिकारी – 1
5) प्रयोग शाळा तंत्रज्ञ – 1
6) एक्स रे टेक्निशिअन – 1
7) परीचर पुरुष – 1, महिला 1
एकूण 8 कर्मचारी कामावर असल्यामुळे त्यात फक्त 4 च कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्रात कामावर असल्यामुळे कर्मचाऱ्यां बरोबर लोकांच्या आरोग्याची हेळसांड या ठिकाणी मोठया प्रमाणावर होत आहे.


एकीकडे देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली. आपण 75 वर्षा नंतर देखील जर जनतेला आपण चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा देऊ शकत नसेल तर आपण कोणती प्रगती केली? कोणता तिर मारला? कोणत्या ताठ मानेने आपण जगतो आहोत. याचा विचार सत्ताधारी व विरोधकांनी केला पाहिजे. एकीकडे सत्तेवर असणारे लक्ष द्यायला तयार नाहीत तर विरोधक यावर जाब विचारायला तयार नाहीत. त्यामुळे सर्व सामान्य माणूस यात होरपळून निघत आहे.

शेवटी
लवकरात लवकर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरून सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न 15 दिवसाच्या आत मार्गी लावावा अन्यथा प्रहार स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रहारचे संपर्क प्रमुख सागर (भाऊ) पवार यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्या कडे केली आहे.


यावेळी उपस्थित
प्रहारचे तालुका अध्यक्ष संदीप तळेकर , तालुका संघटक नामदेव पालवे, तालुका सचिव प्रवीण मखरे, तालुका अध्यक्ष स्वाती ताई गोरे, तालुका कार्याध्यक्ष शारुख शेख, तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव, मलवडी शहर अध्यक्ष जॉन मंगवडे, सौंदे शहर संपर्क पमुख किरण सुकळे, सौंदे शहर अध्यक्ष धनंजय डिकोळे, पाथुर्डी शहर अध्यक्ष समाधान मोठे,केम शहर अध्यक्ष गोटू बोंगाळे,याच बरोबर अनेक प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते.

litsbros

Comment here