केम ग्रामपंचायतीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात साजरी

केम ग्रामपंचायतीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात साजरी

केम (प्रतिनिधी); केम तालुका करमाळा येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सुरूवातीला अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन माजी जि,प, सदस्य दिलीपदादा तळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या निमीत्त सामजिक क्षेत्रात योगदानाबद्दल महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन ग्रामपंचायत स्तरीय हा पुरस्कार करमाळा तालुका शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख सौ वर्षां ताई चव्हाण मॅडम व अन्नपूर्णा महिला बचतगट अध्यक्षा अन्नपूर्णा नारायण कळसाईत याना माजी जि,प, सदस्य व जनता सहकारी बँकेचे चेअरमन दिलीप दादा तळेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

हेही वाचा – अकरा गुन्हात आरोपी असणाऱ्या अट्टल गुन्हेगारास करमाळा येथून अटक; ५ लाखाचे दागिने ही हस्तगत, सोलापूर ग्रामीण यांची धडाकेबाज कामगिरी

पोलिस भरतीमध्ये करमाळा तालुक्यातील योद्धा करिअर ॲकॅडमीचा झेंडा; तब्बल 41 विद्यार्थी यशस्वी

या वेळी सरपंच आकाश भोसले, माजी सहशिक्षक दिलीप देवकर, मिस्त्री तानाजी दोंड,पोस्ट मास्तर राजेंद्र दोंड, बाळू भोसले, राहुल कोरे, दादासाहेब अवघडे, वेदपाठक मॅडम आदि उपस्थित होते.

karmalamadhanews24: