केम येथील ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर बाबा यात्रेनिमित्त ‘या’ विविध कार्यक्रमाचे आयोजन

केम येथील ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर बाबा यात्रेनिमित्त ‘या’ विविध कार्यक्रमाचे आयोजन

केमं (प्रतिनिधी-संजय जाधव); केम तालुका करमाळा येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर बाबाची यात्रा महाशिवरात्री पासून सुरूवात होणार आहे या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत असी माहिती सचिव मनोज सोलापुरे यांनी दिली या मध्ये शिवलीलामृत ग्रंथ पारायण, लघुरुद्राभिषेक, कीर्तन, हरी जागर,श्रीस नैवेद्य, ब्राह्मण भोजन श्रीस अभिषेक असे नित्यनेमाने धामींक कार्यक्रम होणार आहेत .

दि ८रोजी सकाळी ९ते११ ग्रंथ पारायण रात्री ,९ते११ ह,भ,प, सुरेशं थिटे महाराज यांचे कीर्तन व रात्री ११नंतर हरि जागर दि ९रोजी रात्री९ते११ ह,भ,प, घाडगे यांचे कीर्तन व रात्री ११नंतर हरि जागर दि १०रोजी ९ते११ह,भ,प, लालासाहेब चोपडे यांचे कीर्तन व रात्री ११नंतर हरि जागर दि ११रोजी रात्री १२,०५मि,श्री चा भव्य छबीना निघणार आहे या छबिन्या समोर नयनरम्य असे शोभेचे दारूकाम होणार आहे.

त्यानंतर गावातून रात्रभर मिरवणूक दि १२रोजी श्री ऊत्तरेश्वर आखाड्यांमध्ये दुपारी १नंतर मल्ल्यांच्या जंगी कुस्त्या होणार या कुस्त्या साठी नामवंत पैलवानाची हजेरी लागणार आहे

या हि यात्रा शांततेने पार पाडावी या साठी यात्रा कमीटिची बैठक झाली या मिटिंगला करमाळा तालुक्याच्या कर्तव्यदक्ष तहसिलदार शिल्पा ठोकडे करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे साहेब तसेच करमाळा आगाराचे कदम साहेब सार्वजनिक बांधकाम विभागाचे जाधव साहेब आरोग्य विभाग,वीज मंडळाचे अधिकारी उपस्थित होते या वेळी श्री उत्तरेश्वर देवस्थान कमेटिचे सचिव मनोज सोलापूरचे यांनी यात्रेसाठी केम. टेंभूणी एसटया सोडाव्या तसेच करमाळा नगरपालिकेकडून आग्णीशामक गाडी यात्रेसाठी दयावी असी मागणी केली तसेच युवा नेते सागर दौंड यांनी यात्रा कालावधीत दारू बंदि करावी तसेच फिरते शौचालय मिळावे मागणी केली.

हेही वाचा – उच्च ध्येय गाठण्यासाठी शालेय संस्कार दिशादर्शक; प्रा. गणेश करे-पाटील यांचे प्रतिपादन, यशकल्याणी संस्थेचे बागल विद्यालयास केले एकवीस हजार रूपयांचे आर्थिक सहकार्य

वीट येथे रिटेवाडी उपसासिंचन योजनेसाठी रस्ता रोको आंदोलन  आचार संहिता पूर्वी योजना मार्गी लागली नाही तर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार -शेतकऱ्यांचा एल्गार

या वेळी तहसिलदार शिल्पा ठोकडे यांनी केम यात्रेसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यानी दिले तसेच मतदार नोंदणीसाठी यात्रेमध्ये स्टाल लावले जाणार आहे असे त्यानी सांगितले तसेच करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी यात्रेत कुठलाही अनुचीत प्रकार घडू नये तसेच यात्रा कालावधीत दहावी,बारावी,परिक्षा असल्याने पोलीस बंदोबस्त चोख राहणार आहे असे त्यानी सांगितले

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line