केम येथे डेंग्यू, चिकनगुनिया साथीचे रोगाबाबत जनजागृती अभियान संपन्न

केम येथे डेंग्यू, चिकनगुनिया साथीचे रोगाबाबत जनजागृती अभियान संपन्न

केम (प्रतिनिधी संजय जाधव); केम येथील श्री ऊत्तरेश्वर हायस्कूल मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र केम यांच्या वतीने जनजागृती कार्यक्रम संपन्न श्री उत्तरेश्वर हायस्कूल केम येथे डेंग्यू, चिकनगुनिया ,साथीचे रोगांबाबत आरोग्य विभाग (PHC) केम तर्फे जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.

आरोग्य विभाग PHC केम येथील हेड असिस्टंट श्री तोडकरी ए.बी यांनी डेंग्यू, चिकनगुनिया ,साथीचे रोग कसे पसरतात व ते रोखण्यासाठी या साठी आपण पिण्यासाठी जे भांडी वापरतात ते नेहमी स्वच्छ करावीत आठवडयातून एकदा पाणी आपण ज्या हौदात भांडयात साठवतो तो रिकामा ठेवा घराचा परिसर स्वच्छ ठेवा जेणे करून डास होणार नाहित याची काळजी घेतली पाहिजे.

हेही वाचा – करमाळा एसटी स्टँड च्या दुरुस्तीसाठीचा निधी महेश चिवटे यांच्या प्रयत्नामुळे मंजूर झाल्याचा दावा; मा.आ.नारायण पाटील गटावर टीका, श्रेयवाद पेटला!

प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने रावगांव येथे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेविषयी मार्गदर्शन शिबिर संपन्न

उघड्यावर खायचे पदार्थ ठेवू नका हि आपण काळजी घेतल्यास साथीचे रोग होणार नाहित असे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

या वेळी विद्यार्थांनी चांगला प्रतिसाद दिला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाघमारे के एन यानी केले या कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line