आरोग्यकेमसोलापूर जिल्हा

केम येथे झाले नियोजनबद्ध रित्या कोविड लसीकरण कॅम्प; 700 नागरिकांनी घेतली लस

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केम येथे झाले नियोजनबद्ध रित्या कोविड लसीकरण कॅम्प; 700 नागरिकांनी घेतली लस

केम (प्रतिनिधी) करमाळा तालुक्यातील केम येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूद्र कांबळे व माजी सरपंच राजकारणातील किंग मेकर अजित दाद तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि,११ व १२ रोजी मेगा लसीकरण कँप चे आयोजन करण्यात आले होते या साठि १०००डोसची व्यवस्था करण्यात आली होती त्यामध्ये ७००नागरिकानी याचा लाभ घेतला.

सर्वत्र लसीकरणासाठी नागरिंकाची ताराबंळ होत असताना, केम येथे मात्र लसीकरणाचा ऊत्तम पँटर्न तयार केला आहे. यामुळे लसीकरण व्यवस्थित पार पडत आहे ईतर ग्रामपंचायतीने याचे अनुकरण केल्यास नागरिकांना लसीकरणासाठि त्रास होणार नाही.

जि.प.अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे व अजित तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली केम ग्रामपंचायत चे कर्तव्यदक्ष ग्रामसेवक नवनाथ सातव, वैद्यकीय अधिकारी डाँ. संतोष पालखे सरपंच आकाश भोसले,ऊपसरपंच नागनाथ तळेकर राहुल कोरे केम केंद्र प्रमुख महेश कांबळे, कोरोना योध्दै समीर तळैकर सागर तळेकर, राजेंद्र तळेकर दादा गोडगे, लहु तळेकर गणेश आबा तळेकर विजय वायभासे यानी गावातील लसीकरण करण्यासाठि केम पँटर्न तयार केला आहे त्यानुसार शिक्षका माफँत नागरिंकाची नोंदणी केली आहे.

त्यानंतर आठवडयातील दोन ते तीन दिवस लसीकरण केले जाते दि ११व१२रोजी मेगा लसीकरणाचा कँप आयोजीत केला. लस देण्यासाठि शिक्षक नेमले होते. हे शिक्षक जि.प.शाळेमध्ये बसले होते. या मध्ये नागरिकाना आणन्याचे काम कोरोना योध्दे करत होती या वेळि सौशल डिस्टेशन चे पालन करण्यात येत होते वाडया वस्तीवरिल नागरिक लस घेण्यासाठि येत होते.

हेही वाचा-शिवराज्याभिषेक सोहळा व काकासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त केत्तूर २ येथे रक्तदान शिबिर संपन्न

जमिनीच्या वादातून आईनेच केला पोटच्या पोरीचा खून; सोलापूर जिल्ह्यातील घटना

४५ वर्षापुढील नागरिकाना लसीसाठि बोलवण्यात आले होते. मतदाना प्रमाणे लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. ज्या नागरिंकाचे आँनलाईन नोंदणी राहिली अस्या नागरिकांचे नोंदणी शिक्षक व कोरोना योध्दै करीत होते.

litsbros

Comment here