केम गावासाठी कोविडच्या 200 लस द्या, अशी मागणी
केम (प्रतिनिधी) ; केम प्रथमिक केंद्र मध्ये त्वरित 200 लस उपलब्ध करुन द्या अशी मागणी विजयसिंह ओहोळ (मा. तालुका अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग,राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी केली आहे.
करमाळा तालुक्यातील केम येथे आरोग्य विभागात लसीचा मोठा तुटवडा जाणवत आहे, 45 वर्षाच्या वरील जवळपास 75 % लोकांना अजूनही लसीचा 1 ला डोस मिळाला नाही.गावातील कोरोना बधितांची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे.
दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत, बरेचसे रुग्ण दगावले देखील आहेत, गावातील आरोग्य विभाग,ग्रामपंचायत, व तालुका तहसीलदार यांना नम्र विनंती आहे की गावातील कोरोना परिस्थिती लक्षात घेता सुरवातीला दोन दिवसांत 200 लस प्रशासनाने त्वरित उपलब्ध करावी अन्यथा केम-करमाळा आरोग्य विभागाची तक्रार जिल्हाधिकारी व आरोग्यमंत्री यांच्याकडे केली जाईल,ज्या रुग्णांची नोंदणी ऑनलाईन होत नसेल तर त्यांना आधार कार्ड द्वारे ऑफलाईन नोंदणी करून लस देण्यात यावी.
18 वर्षाच्या वरील व्यक्तींचा देखील विचार गांभीर्याने करावा, याची नोंद प्रशासनाने त्वरित घ्यावी आणि कोणत्याही अधिकाऱ्याने गावाच्या हिताच्या दृष्टीने हलगर्जीपणा दाखविल्यास त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले जाईल असा सज्जड इशारा सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह ओहोळ यांनी दिला आहे.
Comment here