केम कोविड सेंटर मधील रुग्णांना या मुख्याध्यापकांच्या वतीने होणार रोज नाष्टा वाटप; इतर दानशूरांना ही मदतीचे आवाहनº
केम(प्रतिनिधी) ; करमाळा तालुक्यातील केम गावचे प्रगतशील शेतकरी गोरख बाबुराव तळेकर यांचे चिरजींव तथा शिवाजी प्राथमिक विदयालयाचे मुखाध्यापक तसेच केम ग्रामपंचायतीचे ऊपसरपंच नागनाथ तळेकर गुरूजी यांनी केम ग्रामपंचायत आपत्ती व्यवस्थापन समितीने केलेल्या आवाहानास प्रतिसाद देऊन केम येथे सुरू झालेल्या कोविड केअर सेंटर मध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णास नाष्टा व दोन अंडी दररोज देण्याचे जाहिर केले.
दिलासादायक; करमाळा तालुक्यातील ‘या’ मोठ्या गावात महाराष्ट्र दिनापासून सुरू होणार कोविड सेंटर
या मुळे कोरोना रूगणास दिलासा मिळाला आहे अडचणीच्या काळात शिक्षकच धाऊन येतो हे तळेकर गुरूजी यांनी सिध्द केले आहे.
अशीच मदत दान शूर व्यक्तीने मदतीचा हात दिला तर या कोविड सेंटर साठि काय अडचण येणार नाही.
Comment here