आरोग्यकेमसोलापूर जिल्हा

केम येथे कोरोना विषयक जनजागृती अभियान

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केम येथे कोरोना विषयक जनजागृती अभियान

केम(संजय जाधव) ; करमाळा तालुक्यातील केम ग्रामपंचायत च्या वतीने कोरोना जनजागृती अभियान राबवण्यात आले.

याचे आयोजन ग्राम विकास अधिकारी नवनाथ सातव यांनी केले होते या निमित्त शिवाजी चौकात भव्य अशी रांगोळी काढली होती. या रांगोळी मध्ये मास्क लावा कोरोना टाळा असा संदेश लिहला होता हि रांगोळी ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत होती गावातून जनजागृतीसाठी प्रभात फेरी काढली.

या मध्ये श्री उत्तरेश्वर माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज नूतन माध्यमिक विद्यालय राजाभाऊ तळेकर विद्यालय शा.गो पवार विदयालय जिल्हा परिषद शाळा येथील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका आरोग्य कर्मचारी महसूल कर्मचारी आदि सहभागी झाले होते या फेरीमधील सर्वानी मास्क घातले होते मास्क घाला कोरोना टाळा अस्या घोषणा दिल्या जात होत्या.

हेही वाचा – हैदराबाद-मुंबई गाडीला केम येथे थांबा द्यावा व ‘या’ इतर गाड्या ही सुरू कराव्यात; प्रवाशांची मागणी

वीज फुकटात कधीपासून मिळायला लागली? वीज वापरतात मग बिल भरायला का नको? – नितीन राऊत

प्रभात फेरी मेन चौकात आल्यावर य ग्रामविकास अधिकारी नवनाथ सातव यानी कोरोना विषयी मार्गदर्शन केले या वेळी ग्रामस्थ उपस्थित होते.

litsbros

Comment here